News Flash

भारतात सुरु असलेले Helo अ‍ॅप झाले बंद, दिला हा शेवटचा संदेश

आज सकाळपर्यंत अॅक्टिव्हेट होतं Helo App

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर मोदी सरकारने चीनवर डिजिटल स्ट्राईक करत टिकटॉक, हेलो यांसह ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. त्याचाच परिणाम म्हणून Helo हे अ‍ॅपही बंद झाले आहे. आज सकाळपर्यंत हे App अॅक्टिव्ह होतं मात्र आता ते बंद झालं आहे. भारत सरकारने ५९ अॅपवर जी बंदी घातली आहे त्यासंदर्भात आम्ही भारत सरकारशी चर्चा करतो आहोत. भारतीय नागरिकांचा डेटा आणि त्यांची माहिती सुरक्षित राहिल याची खबरदारी घेत आहोत असंही त्यांना सांगितलं आहे. या आशयाचा मेसेज करत हे App बंद झालं आहे.

काय आहे Helo चा शेवटचा संदेश?

प्रिय युजर, आम्ही भारतीय सरकारशी चर्चा करतो आहोत. त्यांनी ५९ App बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आमच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार आम्ही एकाही भारतीय युजरचा डेटा लिक करणार नाही. त्यांची प्रायव्हसी अबाधित राहिल.

या मेसेजवर कमेंट करता येत नाही, हा मेसेज कॉपीही करता येत नाही तसेच शेअरही करता येत नाही. तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये असलेलं हॅलो अॅप उघडलंत की हा संदेश येतो आणि अॅप बंद झाल्याचं आपल्याला कळतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 10:34 pm

Web Title: helo app closed in india after modi governments decision about 59 app ban scj 81
Next Stories
1 ‘घरीच राहा, सुरक्षित राहा!’ स्पर्धेतील टॉप ५ स्पर्धक, टॉप १०० जणांची यादी एका क्लिकवर
2 मुंबईत एकाच बिल्डिंगमध्ये १६९ करोना पॉझिटिव्ह आढळले का?, वाचा काय आहे सत्य
3 राहुलने पोस्ट केला कॉफी पितानाचा फोटो, चाहते म्हणाले…
Just Now!
X