News Flash

‘हा’ व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणतात, ‘मी, गरब्याचा रोजच्या व्यायामात समावेश करेन’

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला मुंबईतील गरब्याचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

गरबा नृत्याचा व्हिडीओ

सध्या देशभरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. मुंबई, कोलकात्ता, अहमदाबाद, सुरत सारख्या ठिकाणी अनेकांनी गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यातही मुंबईसारख्या सर्वसमावेशक संस्कृती मेट्रोपोलिटन शहरामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक उत्सव साजरा केला जातो त्याच उत्साहात हा नवरंगांचा उत्साव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी रोजच्या व्यायामामध्ये गरब्याचा समावेश करु शकतो असेही ते ट्विटमध्ये म्हणाले आहे.

सोशल मिडियावर दरवर्षी गरब्याचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या वर्षीही असाच एक मुंबईमधील नवरात्री आणि गरब्याचे सेलिब्रेशन दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पारंपारिक वेशभुषा करुन मुंबईतील अनेक लोकप्रिय ठिकाणी गरबा करणारे तरुण-तरुणी दिसत आहेत. गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी माहराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, कुलाबा किल्ला, एशियाटीक लायब्रेरी, पागोडा, गिरगाव चौपाटीबरोबरच जोगेश्वरी रेल्वे स्थानक या ठिकाणी गरबा नृत्याचा हा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी ट्विट केला आहे.

हा व्हिडीओ ट्विट करताना आनंद महिंद्रा म्हणतात, “मुंबईमधील नवरात्री! या व्हिडीओमध्ये विशेष कॅमेरा कौशल्य दिसून येत नसले तरी व्हिडीओतील नर्तक इतक्या रंगीत कपड्यांमध्ये नाचताना त्या उत्साहाने गिरक्या घेऊन नाचत आहेत ते पाहूनच नवरात्रीचा उत्साह अंगात संचारतो. त्याच्या रोजच्या जीवनातही ते असेच असतील. हा व्हिडीओ पाहून मला असं वाटतय की मी माझ्या रोजच्या ठरलेल्या व्यायामामधून एखादा प्रकार वगळून त्यामध्ये गरब्याचा समावेश करेन”

या व्हिडीओला एक दिवसात ८१ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर दीड हजारहून अधिक जणांनी तो रिट्विट केला आहे. तर आठ हजारहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे.

मुंबईकरांनीही या व्हिडीओला उत्तर देताना लोकल ट्रेनमधील गरब्याचे व्हिडीओही ट्विट केले आहेत.

अनेकांना आनंद महिंद्रांची गरब्याचा व्यायामात समावेश करण्याची कल्पना आवडली असून यामुळे नाच आणि व्यायाम दोन्ही एकाच वेळी करता येईल असे मत नोंदवले आहे. तर काहींनी महिंद्रा सर तुम्हाला गरबा करताना बघायला आवडेल असेही म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 12:28 pm

Web Title: i may abandon one of my exercise do the garba instead anand mahindra
Next Stories
1 अबब ! देवीच्या मंडपासाठी वापरली तब्बल ४ हजार किलो हळद
2 पाहा… ४ कोटींच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजलेले मंदिर
3 OMG! सलग सहा षटकारांसह १२ चेंडूत झळकावले अर्धशतक
Just Now!
X