आधीच संथगतीने वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसला. भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. ही आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसपासून ते अन्य पक्षांनाही मोदी सरकारला या आकडेवारीच्या मुद्द्यावरुन धारेवर धरलं आहे. सोशल नेटवर्किंगवरही याचे पडसाद दिसून येत आहेत. सोशल नेटवर्किंगवर भाजपाने निवडणुकींच्या काळात वापरलेल्या मोदी है तो मुमकीन है या हॅशटॅगचा वापर करुन अनेकांनी मोदी असल्यानेच ही अधोगती झाल्याचा टोला लगावला आहे. #ModiHaiToMumkinHai हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्डींग हॅशटॅग होता. या हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विट केल्याचे पहायला मिळालं. अनेकांनी या हॅशटॅगच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

१) ट्रेण्ड वेगळ्याच कारणासाठी

२) अर्थव्यवस्था आणि…

३) तरी येणार तर…

४) केवढं काय काय झालं

५) आपलाच हॅशटॅग आपल्याविरोधात वापरतात तेव्हा

६) समर्थकांवर निशाणा

७) तरी प्रसारमाध्यमे म्हणतील

८) उलटा करुन पाहण्याचा सल्ला

९) कोणालाच काही ठाऊक नाही

१०) यांना शोधा

११) सहन करु बाकी काय?

१२) तोपर्यंत काय होईल?

१३) तिथं कोण होतं कळलं का?

१४)  अशीही टीका

१५) मोर बघा मोर

अनेक नेत्यांनी तसेच राजकीय पक्षांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही या विषयावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.