09 August 2020

News Flash

IPL 2019: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर व्हायरल झालेले मीम्स पाहिलेत का?

मलिंगावरही नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स

सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत एका धावाने सामन्यात बाजी मारली. आयपीएलमधलं मुंबईचं हे चौथ विजेतेपद ठरलं. पहिल्या तीन षटकांत खोऱ्याने धावा देणाऱ्या मलिंगाने अखेरच्या षटकात आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरचा बळी घेतल्यानंतर, सर्व मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी मैदानात येत जल्लोष केला. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. आपल्या कल्पकबुद्धीला चालना देत नेटकऱ्यांनी या विजयानंतर भन्नाट मीम्स तयार केले आणि सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल झाले.

लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे मलिंगावरही बरेच गमतीशीर मीम्स पाहायला मिळाले. सोशल मीडियावरील हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली. याआधी २०१७ साली झालेल्या अंतिम फेरीतही मुंबईने पुण्यावर एका धावेने मात केली होती. रोहित शर्माचं कर्णधार म्हणून हे चौथं विजेतेपद ठरलं. तर मलिंगा शेवटच्या षटकामुळे आणि प्रामुख्याने शेवटच्या चेंडूमुळे हिरो ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2019 2:15 pm

Web Title: ipl 2019 final mi vs csk funniest memes after the match
टॅग IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : नीता अंबानींचा मंत्रजप, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया
2 पिवळ्या साडीनंतर आता निळ्या ड्रेसमधल्या निवडणूक अधिकाऱ्याची चर्चा !
3 ‘तुझ्यामुळे नापास झालो, माझी फी परत कर’, मेडिकलच्या विद्यार्थ्याची प्रेयसीकडे मागणी
Just Now!
X