कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtam)मध्ये धूम करण्यासाठी देशभरातील गोविंदाने पुन्हा एकदा तयारी केली आहे. शनिवारी २४ ऑगस्ट रोजी यंदा दही हंडीचा उत्सव आहे. या दिवशी कोकणात बालगोपाल मंडळी नाचत नाचत, वाद्ये वाजवीत तोंडाने ‘‘गोविंदा आलाऽरेऽऽ आला’’ किंवा नुसते ‘‘गोविंदा ऽऽगोपाळा’’ अशी गाणी म्हणत गावभर फिरून शेवटी श्रीनारायणाच्या देवालयात जाऊन दर्शन घेऊन मग आपापल्या घरी जातात. श्रावण वद्य नवमीला ‘दहीकाला’ असे म्हणायची प्रथा आहे. आपल्याकडे हा दिवस दहीहंडी म्हणून ओळखला जातो. या दिवशी नाचणाऱ्या बाळगोपाळांच्या अंगावर ताक, दही, कढत पाणी व थंड पाणी ओतण्याची पद्धत आहे. त्यामुळेच या दिवसाचं महत्व बॉलिवूडमधील काही गाण्यांमधूनही स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही गाणी दरवर्षी सर्वत्र लावली जातात आणि या गाण्यांच्या तालावर बाळगोपाळांसह थोर-मोठेही ठेका धरतात….

१) ब्लफ मास्टर (गोविंदा आला रे आला) :

मनमोहन देसाई यांचा१९६३ मध्ये आलेल्या ब्लफ मास्टर चित्रपटातील गाण्यावर गोविंदा थिरकतात. ब्लफ मास्टर या चित्रपटात शम्मी कपूर, सायरा बानो आणि प्राण यांनी प्रमुख भूमिका केली होती. गोविंदा आला रे आला हे गाणं शम्मी कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे गाणं अनेकवेळा रिमिक्स करण्यात आले आहे.

२) खुद्दार (मच गया शोर) :

अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी यांच्या खुद्दार या चित्रपटातील मच गया शोर हे गाणं दही हंडीमध्ये वाजवलेच जाते. या गाण्यात अमिताभ बच्चन दही हंडी फोडताना दिसत आहेत.

३) ओह माय गॉड (गो गो गोविंदा) :

सोनाक्षी सिन्हा आणि प्रभुदेवा यांच्यावर चित्रित झालेले गो गो गोविंदा गाणं दही हांडीमध्ये वाजवलेच जाते. या गाण्यावर अनेकांचे पाय थिरकतात.

४) काला बाजार (आला रे आला गोविंदा आला) :

अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या काला बाजार चित्रपटाती आला रे आला गोविंदा आला हे गाणं दही हंडीमध्ये गोविंदाचा आत्मविश्वास वाढवतो. दही हंडी उत्वात हे गाणं वाजवलेच जाते.

५) हॅल्लो ब्रदर (चांदी की डाल पर) :

सलमान खान आणि रानी मुखर्जी यांच्या चित्रपटातील चांदी की डाल पर.. हे गाणंही दही हंडीमध्ये वाजवले जाते. सलमान आणि राणीच्या युनिक डान्समुळे हे गाणं चर्चित आले होते.

६) वास्तव (हर तरफ है ये शोर) :

संजय दत्त च्या वास्तव चित्रपटातील हर तरफ है ये शोर हे गाणं दही हंडीच्या काळात प्रत्येकाच्या ओठांवर असते.

७) बदला (शोर मच गया शोर) :

1974 मध्ये आलेल्या शत्रुघन सिन्हा यांच्या बदला चित्रपटातील हे गाणं चांगलेच प्रसिद्ध आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आणि किशोर कुमार यांचा आवाजाने हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरले आहे.

८) बडा नटखट है ये कृष्ण कन्हैया –

१९७२ साली प्रदर्शित झालेल्या ‘अमर प्रेम’ या चित्रपटातील ‘बडा नटखट है ये कृष्ण कन्हैय्या’ हे गाणं आज सर्व प्रचलित गाण्यांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना झळकले आहेत. हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं असून आजही गोकुळाष्टमीच्या टॉप गाण्यामध्ये याचा समावेश करण्यात येतो.

९) मैय्या यशोदा ये तेरा कन्हैय्या – 

‘हम साथ साथ है’ चित्रपटातील ‘मैय्या यशोदा ये तेरा कन्हैय्या’ या गाण्यातून कृष्णाच्या बालक्रीडांचं वर्णन करण्यात आलं आहे. या गाण्यात अभिनेत्री करिष्मा कपूर आणि रीमा लागू झळकल्या होत्या. तर सैफ अली खान कृष्णाच्या रुपात दिसला होता.