पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या निर्णयाला विरोध दर्शवत केरळच्या एका चहा विक्रेत्याने मुंडन केले आहे. जोपर्यंत मोदी पंतप्रधान या पदावर राहतील तोपर्यंत आपण हे मुंडन असेच ठेवू अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यातील वाहिया या गृहस्थाने आपले अर्धमुंडन केले आहे. एका छोट्याशा गावात ते चहा विक्री करतात. यातून येणा-या पैशांतून त्यांचे घर चालते. त्यांना दोन मुलं आहेत. या चहा विक्रीतून त्यांनी २३ हजार जमवले होते. ही त्यांची आयुष्यभराची पुंजी होती. मात्र सहकारी बँकेतील सर्व व्यवहार थांबवण्यात आल्याने त्यांना हे पैसे बदलता आले नाही. ते इतर बँकेत तासन् तास रांगेत उभे राहिले पण कमी रक्तदाबामुळे ते घेरी येऊन पडले. त्यांना रुग्णालयात ही भरती करण्यात आले. या निर्णयामुळे आलेल्या नैराश्येतून त्यांनी आपली सारी जमापुंजी जाळून टाकली.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

वाचा : बँकेने दिली १० रुपयांची १५ किलो नाणी

कोल्लम गावात नोटाबंदीच्या निर्णयाबाबात कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे या पैशांचे काय करायचे याबद्दल त्यांना ठाऊक नव्हते यातून आलेल्या नैराश्येतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. वाहिया यांची परिस्थिती हलाखीची आहे . त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले आहे. केरळ विद्यापीठाच्या एका शिक्षकाने ७० वर्षीय वाहिया यांची ही दु:खद काहाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणली. आपल्या या परिस्थितीला मोदींना जबाबदार धरत जोपर्यंत मोदी यांचे पंतप्रधान हे पद जात नाही तोपर्यंत आपण केस वाढवणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली आहे.