पितृछत्र हरपलेल्या २३६ मुलींचे लग्न गुजरातमधल्या एका व्यवसायिकाने मोठ्या थाटामाटात लावून दिले. गुजरातमधल्या पी. पी. सवानी ग्रुपचे मालक असलेल्या महेश यांनी पुढाकार घेऊन या मुलींचे लग्न लावून दिले.

PHOTOS 2016 : सोशल मीडियावर या विवाह सोहळ्यांची चर्चा अधिक

गुजरातमध्ये नुकताच सामुहिक विवाहसोहळा पार पडला. पित्याची माया कधीही न लाभलेल्या या मुलींचे लग्न महेश सवानी यांनी थाटामाटात लावून दिले. आपल्या लग्नाला वडिलांनी आपल्या सोबत असावे असे कोणत्या मुलीला नाही वाटणार? या मुलींच्या लग्नात कोणतीही कमी पडू नये याची काळजी घेत महेश सवानी यांनी २३६ मुलींचे कन्यादान केले. या मुलींमध्ये पाच महाराष्ट्राच्या, तीन राजस्थानमधल्या आणि एक बिहारमधली मुलगी होती. या मुलींना लग्नाची भेट म्हणून कपडे, दागिने आणि भांडी देखील सवानी यांनी दिली.

वाचा : दानशूर भिकारी; देवाच्या चरणी अर्पण केला चांदीचा मुकुट

या भव्य लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमात सवानी परिवारातील दोघांची लग्न देखील झाली. गेल्या पाच वर्षांपासून सवानी पितृछत्र हरपलेल्या मुलींचे लग्न लावून देत आहेत. आतापर्यंत त्यांनी ७०० हून अधिक मुलींची लग्न लावून दिलीत.