12 August 2020

News Flash

नागिन डान्स करताना तरूणाचा कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू

गणपती विसर्जनादरम्यान तो नाचत होता.

आजकाल कोणाच्याही आयुष्याचा भरवसा नसतो म्हणतात हे खरंय. असाच एक प्रकार नुकताच मध्य प्रदेशमध्ये घडला. गुरूवारी देशभरात सर्वांनी जड अंत:करणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. परंतु गणपती विसर्जनादरम्यान नाचताना एका 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला.

विसर्जनादरम्यान नागिन डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरूण आणि अन्य काही जण नागिन डान्स करताना दिसत आहेत. नाचतानाच एकदम त्या तरूणाला कार्डिअॅक अरेस्टचा झटका आणि तो तरूण जमिनीवर कोसळला. गुरूचरण ठाकूर असं या तरूणाचं नाव आहे. सुरूवातीला त्याच्या सोबत असलेल्यांना तो खाली पडलेला हा त्याच्या नाचातलाच भाग असल्याचं जाणवतं. परंतु त्यानंतरही तो उठत नसल्यानं अन्य लोकांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 3:35 pm

Web Title: man died during ganapati visarjan dance madhya pradesh jud 87
Next Stories
1 सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मांजरीचा मृत्यू; तब्बल ७०० कोटींची होती मालकीण
2 ‘टेरिबल मराठी टेल्स’ला फॉलो करता? तर मग हे नक्की वाचा..
3 हॉलिवूडपटांची ‘ही’ हिंदी नावे वाचून हसून हसून दुखेल पोट
Just Now!
X