‘करावे तसे भरावे’ ही म्हण मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. या म्हणीला साजेसा असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्यावरुन एक व्यक्ती जाताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेने चालत असताना अचानक एक कुत्रा त्या व्यक्तीच्या अंगावर भुंकण्यास सुरूवात करतो. अचानक कुत्रा भुंकायला लागल्याने पहिल्यांदा तो माणूस दचकतो. नंतर रागाच्या भरात तो त्या कुत्र्याला जोरदार लाथ मारायला जातो. पण लाथ मारताना त्याचाच तोल जातो आणि तो रस्त्यावर जोरात पडतो.
Karma has no menu
It serves what one deservesHere it was instant….. pic.twitter.com/4brcZHz971
— Susanta Nanda (@susantananda3) June 21, 2020
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एक दिवसापूर्वीच हा व्हिडिओ शेअर केला असून आतापर्यंत दीड हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाइक केलाय. तर जवळपास अडीचशे युजर्सनी हा व्हिडिओ रिट्विट केला असून युजर्स आपल्या मजेशीर प्रतिक्रिया यावर देत आहेत.