चीनमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पार्श्वभागाला खाज आल्याने बाटलीच्या सहाय्याने खाजवण्याचा प्रयत्न करताना बाटलीच वेन नावाच्या तरुणाच्या गुदद्वारामध्ये घुसली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी ही बाटली तरुणाच्या शरीरामधून बाहेर काढली आहे.

दक्षिण चीनमधील डोंगगुआन येथील रुग्णालयामध्ये ही शस्रक्रिया पार पडली. “पार्श्वभागाला खाज अली असताना बाटलीच्या सहाय्याने खाजवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी अपघाताने ही बाटली शरीरामध्ये गेली,” असं या तरुणाने डॉक्टरांना सांगितलं आहे. डॉक्टरांनी शस्रक्रियेनंतर बाहेर काढलेली बाटली ही सात इंच लांब आणि दोन इंच रुंद आहे. डोंगगुआन रुग्णालयातील कोलन आणि रेक्टल सर्जरी विभागाचे संचालक असणाऱ्या डॉ. लीन जून यांनी ही शस्रक्रिया केली. एक्स रेच्या मदतीने डॉक्टरांनी नक्की ही बाटली कुठे आणि कशी आडकली आहे याचा अंदाज घेतला आणि त्यानंतर शस्रक्रिया केली. वेन नावाच्या या व्यक्तीला शस्रक्रियेनंतर काही तासांनी रुग्णालयामधून घरी पाठवण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी अशाप्रकारे एका २६ वर्षीय तरुणावर शस्रक्रिया करुन गुदद्वारेमधून हॅण्ड शॉवर बाहेर काढण्यात आला होता. बाथरुमध्ये पाय घसरुन पडल्याने हा हॅड शॉवर त्याच्या शरीरामध्ये घुसला होता. त्यानंतर या तरुणाने स्वत:च शॉवरचा पाईप काढून रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. डॉक्टरांनी चौकशी केली असता हा एक अपघातच असल्याचे तरुणाने सांगितले होते. सुदैवाने या तरुणाला कोणतीही अंतर्गत जखम झाली नाही आणि शस्रक्रियेनंतर त्याला डॉक्टरांनी काही तासांमध्ये घरी पाठवले.

अशाचप्रकारे थायलंडमधील एका व्यक्तीने काही दिवसापूर्वी स्वत:च्या शरीरामधून ३२ इंचाची टेपवर्म बाहेर काढली होती.