News Flash

‘अभ्यासू’ पतीमुळे पत्नी वैतागली, घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

महिलेचं माहेर महाराष्ट्रात असून 2018 मध्ये लग्न झालं होतं

(सांकेतिक छायाचित्र)

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या पतीच्या सततच्या अभ्यासाला वैतागून पत्नी माहेरी निघून गेली आणि तीन महिन्यांपासून तिथेच राहतेय. परिणामी आता प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ही घटना असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात संबंधित दाम्पत्याचं समुपदेशन केलं जात आहे.

संबंधित महिलेचं माहेर महाराष्ट्रात असून 2018 मध्ये लग्न झालं होतं, पतीसोबत केवळ तीन महिने राहिल्यानंतर ती पतीला सोडून माहेरी आली. “पतीने स्वतःला अभ्यासापर्यंतच मर्यादित ठेवलं, एकत्र राहून देखील मी सोबत असल्याची साधी जाणीव देखील त्याला कधी झाली नाही. पती सतत UPSC ची तयारी करत असतो. सातत्याने अभ्यासात गुंतून असल्यामुळे माझ्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो, परिणामी उपेक्षित असल्याची भावना माझ्या मनाय येते “, अशी तक्रार संबंधित महिलेने केली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमधील सल्लागार नुरननिसा खान यांनी याबाबत माहिती दिली. या महिलेचा पती पीएचडी धारक असून कोचिंग क्लासही चालवतो. घरातील एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांपैकी एक जण आजारी असल्यामुळे त्याने तातडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, “लग्नाच्या तीन महिन्यांनंतर पत्नी अचानक माहेरी निघून गेली. तिकडे गेल्यापासून आमच्या दोघांमध्ये संपर्क नाहीये, कारण ती परत यायला तयार नाही. नातेवाईकांनी केलेली मध्यस्थीही कामी न आल्यानंतर अखेर घटस्फोटासाठी अर्ज दाखल करावा लागला”, असं महिलेच्या पतीचं म्हणणं आहे. तर, “आम्ही नवदाम्पत्याचं समुपदेशन करत आहोत. त्यांचं वैवाहिक जीवन वाचावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या जोडप्याचं वैवाहिक जीवन वाचवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. प्रकरण कोर्टासमोर सुनावणीला जाण्यापूर्वी चार सत्रांमध्ये दोघांचं समुपदेशन केलं जाईल”, अशी माहिती नुरननिसा खान यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 2:30 pm

Web Title: man toils to crack upsc wife seeks divorce saying husband always too busy in studying sas 89
Next Stories
1 अनोखं नातं ! चिमुकलीवर उपचारासाठी बाहुलीला करावं लागलं प्लास्टर, डॉक्टरही हैराण
2 VIDEO: स्विगीचा डिलिव्हरी बॉय ते यशस्वी उद्योजक
3 Video : पंतप्रधान मोदींचे नाव घेताच पाकिस्तानी मंत्र्याला बसला वीजेचा झटका !
Just Now!
X