लहान मुले म्हणजे निरागसपणा. अनेकदा त्यांनी विचारलेल्या निरागस प्रश्नांना उत्तर देणेही शक्य होत नाही. मुलांमध्ये असणारा हा निरागसपणा अनेकदा मोठ्यांमध्ये हरवल्यासारखा वाटतो. म्हणूनच चूक झाल्यानंतर अनेकदा वादविवाद न करता मुले निरागसपणे माफी मागतात. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

मिझोरममधील एका लहान मुलाबद्दलची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर साठ हजारहून अधिक जणांनी शेअर केली आहे. पोस्टमधील माहितीनुसार येथील साईरंग भागातील लहान मुलगा सायकल चालवत असताना शेजारच्यांनी पाळेल्या कोंबडीचे एक पिल्लू त्याच्या सायकलच्या चाकाखाली आले. या प्रकराननंतर हा मुलगा त्या कोंबडीच्या पिल्लाला हातात घेऊन धावतच जवळच्या रुग्णालयात गेला. आपल्याकडील सर्व पैसे देत या पिल्लाला ठिक करा असं तो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगू लागला.

ही पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली असून या मुलाच्या हावभावांवरुन त्याला झालेले दुख: दिसून येत आहे. अनेकांनी या मुलाच्या निरागसपणाचे कौतुक केले आहे. आपणही इतके निरागस असतो तर खरोखरच जग अधिक सुंदर झाले असते असं मत अनेकांनी या पोस्टखालील कमेन्टमध्ये व्यक्त केले आहे. अवघ्या काही तासांमध्ये पाच हजारहून अधिक जणांनी या पोस्टवर कमेन्ट करुन आपले मत नोंदवले आहे. पाहुयात अशाच काही प्रतिक्रिया…

हा कोंबडीच्या पिल्लू जिवंत आहे की मेले याबद्दल पोस्टमध्ये काहीही माहिती देण्यात आलेली नाही. तरी या मुलाने दाखवलेल्या माणुसकीमुळे ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेकांनी मुलीच स्तृती केली आहे.