संसदेत अथवा विधानसभेच्या सत्रादरम्यान अनेक गंमतीशीर आणि आवाक् करणारे किस्से घडत असतात. टीव्हीवरुन संसदेतील कामकाज पाहताना अनेकदा आपण लोकप्रतिनिधी कुठल्यातरी विषयावर गप्पा मारताना, न आवरणाऱ्या झोपेमुळे डुलक्या काढताना किंवा मोबाईलमध्ये गेम्स वगैरे खेळताना अनेकदा पाहिले आहेत. परंतु असे प्रसंग केवळ भारताच घडतात असे नाही. इटलीमध्ये तर संसद सत्रादरम्यान महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना एका खासदाराने चक्क प्रेयसीला प्रपोज केले.

Viral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका

फ्लॅवियो डी मुरो (Flavio Di Muro) असे या ३३ वर्षीय खासदाराचे नाव आहे. इटलीमध्ये २०१६ साली झालेल्या भूकंपाबाबत ते भाषण करत होते. दरम्यान त्यांनी अचानक आपले भाषण थांबवले व आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. समोर घडलेला प्रकार पाहून संसदेतील इतर खासदार सुरुवातील गोंधळले, परंतु त्यानंतर सर्वांनी एकच हास्यकल्लोळ केला.

प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे फ्लॅवियो डी मुरो यांनी प्रेयसीला केवळ प्रपोजच केले नाही, तर ते आपल्यासोबत एक अंगठीही घेऊन आले होते. ती अंगठी दाखवून त्यांनी “एलिसा माझ्यासोबत लग्न करशील का?” असे म्हणत तिला लग्नासाठी मागणी घातली. यानंतर संसदेतील सर्वच सदस्यांनी त्यांची गळाभेट घेत अभिनंदनही केले.