News Flash

लॉकडाउनमुळे ‘नेटफ्लिक्स’ मालामाल; १.५ कोटींपेक्षा जास्त मिळाले नवे युजर्स

नेटफ्लिक्सला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असल्याचं पाहायला मिळतं

मनोरंजन क्षेत्रात सध्या चर्चा आहे ती अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग वेबसाइट्सची. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सध्या अनेक नवनवीन अॅप्स उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतात. यामध्येच नेटफ्लिक्सला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या काळात नेटफ्लिक्स मालामाल झालं असून केवळ तीन महिन्यांमध्ये त्यांच्या नव्या युजर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे.

करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. या काळात सर्व काही बंद असल्यामुळे त्याचा परिणाम थेट देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र या काळात नेटफ्लिक्सची चांगलीच चलती असल्याचं पाहायला मिळत आहे. नेटफ्लिक्सला या लॉक़ाउनच्या काळात कोटींच्या घरात नवे युजर्स मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

‘द हिंदू’नुसार, लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळलेल्या अनेकांनी मनोरंजनासाठी विविध अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रिमिंग वेबसाइटचा आधार घेतला आहे. यात जगभरातल्या अनेकांनी नेटफ्लिक्सला सबस्क्राइबर  केलं आहे. त्यामुळे जगभरातून नेटफ्लिक्सला तब्बल १५.७७ मिलियन म्हणजे जवळपास १.५ कोटींपेक्षा जास्त नवे सब्सक्राइबर्स मिळाले आहेत.

लॉकडाउन असल्यामुळे या काळात ७ मिलियन नवे सबस्क्राइबर  मिळतील असं कंपनीला वाटत होतं. मात्र त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त युजर्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या काळात जवळपास ६४ मिलियन लोकांनी ‘टायगर किंग’ डॉक्युमेंट्री पाहिली आहे. तर नेटफ्लिक्सचा ओरिजन चित्रपट ‘सस्पेंसर कॉन्फेंडेशिअल’ला ८५ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.

ऑल्ट बालाजीलाही लॉकडाउनचा फायदा

नेटफ्लिक्सप्रमाणेच ऑल्ट बालाजीच्यासबस्क्राइबरमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. या कंपनीला १७ हजार नवे सबस्क्राइबर  मिळाले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 1:30 pm

Web Title: netflix adds over 15 million subscribers warns of decline after lockdown boom ssj 93
Next Stories
1 “आम्हाला कोणी करोनाबद्दल सांगितलचं नाही”; समुद्र सफरीवरुन आलेल्या दाम्पत्याला बसला धक्का
2 परवानगी मिळाली…पण तरीही Maruti नाही सुरू करणार प्रोडक्शन !
3 Drone Footage: लॉकडाउनदरम्यान समुद्रकिनारी घेत होता सनबाथ, पोलिसांना ड्रोन कॅमेरात दिसला आणि…
Just Now!
X