25 February 2021

News Flash

मॅगीसोबत खाल्ली ‘मक्की की रोटी’, नेटकरी म्हणतात… ‘इसके पेट पर बाण मारिए प्रभु!’

'मक्की की रोटी आणि मॅगी' या विचित्र कॉम्बिनेशनचा 'न पचणारा धक्का'!

‘मक्की की रोटी और सरसों का साग’ या लोकप्रिय पंजाबी डीशबाबत तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल. नावानुसार ‘मक्की की रोटी आणि सरसों का साग’ यांचं नातं जन्माजन्माचं असल्याचं उत्तर भारतीय खवय्ये मानतात. पण, एका व्यक्तीने हे नातं तोडण्याचं पाप केलंय… घटना इंटरनेटच्या जगातील आहे. इथे एका फोटोमुळे नेटकरी पार चक्रावून गेलेत. हा फोटो पाहून नेटकरी ‘इसके पेट पर बाण मारिए प्रभु!’ हा सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रामायणमधील डायलॉग वापरतायेत. कारण…असं काही बघायला मिळेल अशी अपेक्षा कदाचितच कोणी केली असावी. झालं असं की, लॉकडाउन असल्याने घरबसल्या कोणीतरी मॅगीसोबत ‘मक्की की रोटी’ खात असल्याचा फोटो ट्विटरवर टाकला आणि आता नेटकरी आपल्या ‘धक्कादायक’ प्रतिक्रिया व्यक्त करतायेत.

सर्वप्रथम हा फोटो @rishav_sharma1 या ट्विटर युजरने शेअर केला. त्या फोटोसोबत ‘मॅगीसोबत मक्की की रोटी’ अशाप्रकारचे कॅप्शन दिले. या कॅप्शनसोबत त्याने ‘तोंडाला पाणी आलंय’ या आशयाच्या इमोजीचाही वापर केला. त्याचं हे ट्विट पाहून नेटकऱ्यांच्या तोंडाला पाणी नाही आलं, उलट ‘मक्की की रोटी आणि मॅगी’ या विचित्र कॉम्बिनेशनचा ‘न पचणारा धक्का’ नक्कीच बसला. आता यावरुन बरेच मीम्स व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. एक नजर मारुया नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांवर :-

दुनिया सच में खत्म होने वाली है…

सर्फ एक्सेलची पावडरपण मिक्स करायची ना…

इसके पेट पर बाण मारिए प्रभु

मौत आएगी लगता है!

पंजाबी लोकांची रिएक्शन

रोटी ने क्या बिगाड़ा था?

अरे मोरी मैय्या…जे का देख लियो!

कुठुन येतात ही लोकं?

देवाला तरी घाबर भावा…

हे बघण्याआधी तुझं अकाउंट का नाही सस्पेंड झालं…

वृत्त लिहेपर्यंत या फोटोला एक हजाराहून अधिक जणांनी लाइक केले आहे. तर, २५० हून जास्त नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:13 pm

Web Title: netizen try makki ki roti with maggi now twitter is calling it the end of the world sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: अमित शाह ठणठणीत; त्या एका फोटोमुळे सरकारलाच करावा लागला खुलासा
2 घरीच करा करोनाची ‘टेस्ट’, देशातील पहिले ‘रॅपिड कोव्हिड-१९ होम स्क्रीनिंग टेस्ट किट’ लाँच
3 “तेव्हा या घोषणेने करोना जाईल का विचारलं आणि आज…”; आठवलेंनी करुन दिली ‘गो करोना…’ची आठवण
Just Now!
X