‘लग्न करतोस ना? आता तुझे वाईट दिवस सुरू होतील’ असं आपण गंमतीने मित्रांना म्हणतो. पण कोणाचे लग्नाआधीच वाईट दिवस सुरू झाल्याचं पाहिलंय का? मग सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. आपल्या सजवलेल्या गाडीतून हा नवरा लग्नमंडपाच्या दिशेने निघाला खरा पण तिथे पोहोचण्याआधीच त्याची गाडी बंद पडली दुर्दैव म्हणजे पावसामुळे रस्त्यात ठिकठिकाणी पाणीही साचलं होतं.

एकीकडे लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता, तेव्हा या पाण्यात आपण अडकलो तर गोंधळ व्हायचा म्हणून बिच्चारा हा नवरदेव स्वत: गाडीतून खाली उतरला. धक्का मारतच त्याला आपली गाडी या पाण्यातून बाहेर काढावी लागली. गळ्यात फुलांची माळ, डोक्यावर फेटा आणि कुडता पायजमा घालून तय्यार झालेल्या या नवरदेवाला रस्त्यात गाडीला धक्का मारताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा नवरदेव एवढा वैतागला होता की एका हातात पायतल्या मोजड्या आणि दुसऱ्या हाताने स्वत:चा नवाकोरा ड्रेस सांभाळत तो कशीबशी आपली गाडी ढकलत नेत होता. पाकिस्तानमधला हा व्हिडिओ असल्याचं समजत आहे. ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने हा व्हिडिओ अपलोड केलाय.

thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार