News Flash

Video : पाकिस्तानी गायिकेने मराठी रसिकांसाठी गायले प्रेमगीत

भारतातील आणि जगभरातील मराठी रसिकांसाठी सप्रेम भेट

'जोगावा' चित्रपटातलं आणि अजय अतुलने संगीतबद्ध केलेलं 'जीव दंगला रंगला' हे प्रसिद्ध गाणं नाझियाने गायलंय

पाकिस्तान.. जिथे उर्दू आणि हिंदी भाषा बोलली जाते. तिथल्या लोकांना आपली मराठी भाषा माहिती असणं किंवा ती बोलता येणं तसं अशक्यच. पण पाकिस्तानी गायिका नाझिया अमिन मोहम्मद हिने मात्र ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. भारतातल्या मराठी रसिकांसाठी तिने खास मराठी भाषेतलं प्रेमगीत गायलं आहे.’जोगावा’ चित्रपटातलं आणि अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं ‘जीव दंगला रंगला’ हे प्रसिद्ध गाणं तिनं गायलं आहे. याचा व्हिडिओदेखील नाझियाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केलाय. कराचीमध्ये राहत असेल्या नाझियाने बुधवारी रात्री उशिरा हा व्हिडिओ अपलोड करुन अनेकांची मनं जिंकली आहे. नाझियाने जीव रंगला इतकं उत्तम गाण्याचा प्रयत्न केलाय की एका पाकिस्तानी गायिकेने ते गाणं गायलं आहे हे ऐकूनही कोणाला खरं वाटणार नाही. ‘भारतातील आणि जगभरातील मराठी रसिकांसाठी उर्दू भाषिक पाकिस्तानींकडून ही सप्रेम भेट आहे आहे. संगीताला कोणत्याही सीमा आणि बंधनं नसतात असं सांगत तिने गाणं गात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय.

थोडे फार शब्द इकडे-तिकडे झाले असले तरी नाझियाने मात्र हे गाणं प्रामाणिकपणे गाण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा मराठी रसिकांनाही नाझियाची ही भेट खूपच आवडली आहे. काही महिन्यांपूर्वी नाझियाने भारतातल्या मल्याळी भाषिकांसाठी गाणं गायलं होतं. याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओला भारत आणि दुबईमधून तुफान प्रसिद्धी मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 10:12 am

Web Title: pakistani singer nazia amin mohammad sing marathi song jiv dangala rangala composition of ajay atul
Next Stories
1 आजींचं भन्नाट डोकं! ‘गुडलक’साठी चक्क विमानाच्या इंजिनमध्ये टाकली नाणी
2 केंद्रीय मंत्र्यांची सार्वजनिक ठिकाणी लघुशंका; स्वच्छता अभियानावरच पाणी फेरले!
3 Viral Video : जेव्हा ट्रम्प महिला पत्रकाराच्या हास्यावर भाळतात
Just Now!
X