एकाद्या दुकानामध्ये किंवा घरात चोर शिरल्यानंतर उडालेले गोंधळ किंवा दुकानदाराने चोराला कशाप्रकारे पडकलं अशापद्धतीचे अनेक व्हिडिओ आपण इंटरनेटवर पाहतो. अनेकदा अशा बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र अमेरिकेतील एका पिझ्झाच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरावर दुकान मालकाने चक्क पिझ्झाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीच यासंदर्भात माहिती दिली असून नक्की काय आणि कसं घडलं याचा तपास पोलीस करत आहेत.

अमेरिकेतील डेलवेअर येथील ग्रीडवूडमध्ये असणाऱ्या स्टारग्रेझ पिझ्झाच्या मालकाबरोबर ही विचित्र घटना घडली. डेलेवेअर पोलिसांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या माहितीनुसार १० जुलै रोजी दुकान बंद करण्याची तयारी करत असतानाच एक जण दुकानात आला आणि त्याने चाकूचा धाक दाखवून पैसे देण्याची मागणी दुकान मालकाकडे केली. मात्र मालकाने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्याचवेळी हातातील पिझ्झा या व्यक्तीच्या तोंडावर फेकून मारला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरुन चोराने पळ काढला. हा चोर गाडीमध्ये बसला आणि त्याने पळ काढल्याचे दुकान मालकाने पोलिसांना सांगितलं. पिझ्झाच्या मदतीने स्वत:चा जीव वाचवणाऱ्या मालकाचे ट्विटवर कौतुक होत असून काहीजणांनी मात्र मजेदार कमेंट शेअर केल्या आहेत.

पिझ्झा जीव वाचवू शकतो

पिझ्झा फेकल्यावर चोर…

फूड वॉर

तो पायनॅपल पिझ्झा होता का?

चटकला असेल चोर

आक्रमण

ब्रेडस्टीक्सपण वापरा…

प्राणघातक ठरु शकतो…

पिझ्झापासून वाचवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकंदरितच या कमेंट पाहिल्यावर पिझ्झाने या मालकाचा जीव वाचवला असेच म्हणावे लागेल.