15 October 2019

News Flash

महाराष्ट्रात लॉन्च झाली नॅनोपेक्षाही स्वस्त ‘मायक्रो कार’, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..

ही गाडी नॅनोपेक्षाही लहान आणि स्वस्त आहे

बजाज ऑटोने महाराष्ट्रात नॅनोपेक्षाही लहान कार लॉन्च केली आहे. विशेत: मध्यमवर्गीय लोकांसाठी या कारची निर्मिती करण्यात आली आहे. या कारचे नाव ‘क्यूट क्वॉड्रिसाइकल’ (Qute Quadricycle) असे आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही प्रकारच्या इंधनावर चालू शकते. पेट्रोलवर चालणाऱ्या कारची किंमत २.४८ लाख रुपये आहे. तर सीएनजी कारसाठी आपल्याला २.७८ लाख रुपये मोजावे लागतील.

एकावेळी चार लोक या गाडीमधून प्रवास करू शकतात. या कारमध्ये २१६ सीसी ट्विन स्पार्क DTSI इतक्या क्षमतेचे इंजिन आहे. हे इंजिन ५५०० rpm वर १३ BPH पावर जनरेट करते. Qute Quadricycle ७० किलोमीटर प्रति वेगाने पळू शकते. या गाडीचे इंजीन इतर चार चाकी गाड्यांच्या तुलनेने लहान असल्यामुळे ही केवळ ३५ किलोमीटरचा अॅव्हरेज देऊ शकते. ही गाडी बरीच लहान आहे. या गाडीची लांबी केवळ २ हजार ७५२ एमएम व रुंदी १ हजार ३१२ आहे. तसेच Qute Quadricycle उंची १ हजार ६२२ एमएम आहे. महाराष्ट्राव्यतीरीक्त ही कार गुजरात व उत्तर प्रदेश या दोन राज्यांत लॉंच केली गेली आहे.

First Published on April 19, 2019 12:45 pm

Web Title: qute quadricycle launch in maharashtra