News Flash

जेव्हा सचिन रॉजर फेडररला विचारतो, मला टिप्स देतोस का??

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका क्रीडा जगतालाही बसला. अनेक आजी-माजी खेळाडू या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होते. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक महिन्यांनी घराबाहेर पडून आपल्या मित्रांसोबत टेनिस खेळणं पसंत केलं.

आपल्या मित्रांसोबत टेनिस खेळतानाचा व्हिडीओ सचिनने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत, थेट रॉजर फेडररला फोरहँड शॉटसाठी टिप्स देतोस का? असं विचारलं…

सचिन हा रॉजर फेडररच्या खेळाचा मोठा चाहता आहे. याआधीही विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररचा सामना पाहण्यासाठी सचिनने हजेरी लावली होती. सोशल मीडियावर दोन्ही खेळाडूंमध्ये अशा प्रकारचं गमतीशीर द्वंद्व रंगण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही सचिनच्या ट्विटला फेडररने उत्तर दिलं होतं.

सचिनने पोस्ट केलेल्या व्हिडीओला अद्याप फेडररने उत्तर दिलेलं नसलं तरीही क्रीडाप्रेमी या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये सोशल मीडियावरचा संवाद कसा रंगतो हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 11:38 am

Web Title: sachin tendulkar plays tennis with friends asks for tips on his forehand from roger federer psd 91
Next Stories
1 चंडीगडमधील सामन्याचा संशयकल्लोळ
2 ला-लीगा  फुटबॉल स्पर्धा : रेयाल माद्रिदची आघाडी बळकट
3 माजी बॉक्सिंगपटू डिंको सिंग करोनामुक्त
Just Now!
X