18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

Viral : सानियाचा आवडता खेळाडू कोण माहितीये?

चाहत्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: December 7, 2017 5:26 PM

ट्विटरवर ७० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केल्याच्या आनंदात सानियानं खास प्रश्नोत्तरांचा तास ठेवला होता

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा ही ट्विटरवर चांगलीच सक्रिय असते. ती स्वत: टेनिस खेळत असली तरी क्रिकेटही तिला तितकेच आवडते. जेव्हा चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सानियाला तिच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारलं तेव्हा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे माझे आवडते क्रिकेटर असल्याचं तिनं ट्विटरवर सांगितलं.

तीन हजार कोटी मोजून लिओनार्दो दा विंचींचे ‘ते’ चित्र कोणी विकत घेतलं माहितीये?

Viral Video : …अंतराळातील ही पिझ्झा पार्टी पाहिलीत का?

भारताचा आवडता खेळाडू कोण? असं सानियाला विचारण्यात आलं होतं. इतकंच नाही तर श्रीलंकन संघाचा आवडता खेळाडू कोण? हेही तिला चाहत्यांनी विचारलं. त्यावेळी तिनं कुमार संगकाराचं नाव घेतलं. ट्विटरवर ७० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केल्याच्या आनंदात सानियाने चाहत्यांशी संवाद साधला. यात ठराविक वेळेपर्यंत प्रश्न विचारण्याची संधी तिनं चाहत्यांना दिली होती. ही संधी न दवडता चाहत्यांनी तिला तिचे आवडता अभिनेता, चित्रपट, खाद्यपदार्थ अशा अनेक विषयांवर प्रश्न विचारले आणि सानियानेही या प्रश्नांची खुलेपणानं उत्तरं दिली.

चाहत्यांनी सानियाला विचारलेले प्रश्न
आवडते क्रिकेटर – महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली
आवडता श्रीलंकन क्रिकेटर – कुमार संघकारा
आवडता चित्रपट – कुछ कुछ होता है
आवडता हिरो- अक्षय कुमार, सलमान खान
सर्वात कंटाळवाणी गोष्ट- वाट बघणं
आवडता गायक- अरिजित सिंग

First Published on December 7, 2017 5:26 pm

Web Title: sania mirza twitter question answer session after hitting the 7 million followers mark