करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जारी केलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घरीच वेगवेगळे पदार्थ बनवून खाण्याचा आणि त्या पदार्थांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्याचा जणू ट्रेण्डच आला होता. मध्यंतरी तर एका व्यक्तीने करोनामुळ घरी बसून कंटाळा आल्याने चक्क करोना विषाणूच्या आकाराचे भजी बनवले होते. या भजींची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा झाली होती. असं असतानाच आता पुन्हा एकदा भजी हा विषय सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र हे भजी साधेसुधे नसून चक्क ओरीओ बिस्कीटपासून बनवलेले भजी आहेत. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. कोणीतरी खरोखरच ओरीओ भजी बनवले आहेत आणि यावरुनच आता नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

नक्की वाचा >> Viral Photo: कलिंगडाच्या फोडीवर टाकले टोमॅटो केचप अन्…

झालं असं की ३ जून रोजी एका व्यक्तीने ट्विटवर एक पोस्ट केली. “माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने ओरीओ भजी बनवले असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत,” अशा कॅप्शन सहीत फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये बेसन पिठाचे आवरण असलेली ओरीओ बिस्कीटं तळून प्लेटमध्ये ठेवल्याचे दिसत आहे. तुम्हीच पाहा हा फोटो…

हा फोटो ट्विटवर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी अशाप्रकारे बिस्कीटांचे ते ही गोड बिस्कीटांचे भजी बनवण्याचा विचार भयंकर असल्याचे मत व्यक्त केलं आहे. काहींनी लोकं लॉकडाउनमध्ये वेडी झाल्याची टोला लगावला आहे तर काहींनी या व्यक्तीबद्दल तक्रार करण्याची गरज असल्याचे मत नोंदवलं आहे. जाणून घेऊयात नक्की कोणाचं काय म्हणणं आहे.

१) गाजराच्या पिझ्झापेक्षा भयंकर आहे हे

२) डोळ्यांना त्रास झाला

३) हा गुन्हा आहे

४) हे न बघितल्यासारखं कसं करायचं?

५) बापरे माझे डोळे

६) अंत जवळ आला आहे

७) पहिली प्रतिक्रिया हीच होती

८) यासाठी शिक्षा आहे

९) कायदा काय सांगतो?

१०) गुन्हा आहे हा

एकंदरितच या भज्यांवरुन नेटकरी चांगलेच संतापल्याचे चित्र दिसत आहे. असं असलं तरी तुम्हाला असं प्रयोग करायला आवडेल का आणि या फोटोबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा