ऑस्ट्रेलिया भीषण आगीच्या वणव्यामुळे होरपळला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या या भीषण आगीत जवळपास ४८ कोटी प्राणी आणि पक्ष्यांना आपला जीव गमावावा लागला. याच जिवघेण्या परिस्थितीमध्ये स्टिव्ह इरवीन हा वन्यजीव संरक्षणकर्त्याच्या कुटुंब देवदूत बनून प्राण्यांच्या रक्षणांसाठी धावून आले. स्टिव्हच्या कुटुंबांनी तब्बल ९० हजार जनावरांचा जीव या भीषण आगीतून वाचवाला. स्टिव्हच्या कुटुंबानं ९० हजार प्राणी आणि पक्ष्यांवर उपचार केले आहेत. या कामगिरीमुळे स्टिव्ह यांच्या कुटुंबावर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
स्टिव्हचे कुटुंब क्विसलँडमध्ये एक रूग्णालय चालवत आहे. त्यांनी आगीमध्ये होरपळलेल्या ९० हजार जंगली जनावरांचा जीव वाचवला आहे. स्टिव्ह यांची मुलगी बिंडीने ही सर्व माहिती दिली आहे. बिंडी ऑस्ट्रेलियामध्ये वन्यजीव रूग्णालय चालवते. ऐवढेच नाही तर जंगली जनावरांचे आगीतून बाहेर आल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केले आहेत.
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स या राज्याला आगीचा सर्वात मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियातील खुरटय़ा जंगलांमध्ये लागलेल्या आगींचे विक्राळ वणवे बनले असून, व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यांमध्ये या वणव्यांनी हाहाकार उडवून दिला आहे. ‘बुशफायर’ असे या वणव्यांचे नामकरण करण्यात आलं आहे. हे वणवे काबूत आणण्यासाठी ऑस्ट्रेलियातील सर्व थरांतील सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संघटना, अग्निशमन आणि वनवणवे तज्ज्ञ कामाला लागले आहेत.
आग का वाढली?
ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील भागात गेली जवळपास तीन वर्षे दुष्काळ असल्याने या भागांमधील जंगले, कुरणांमध्ये सुकलेला पालापाचोळा प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळेच हा वणवा पसरत गेला आणि त्याने भीषण रुप धारण केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2020 10:11 am