News Flash

चक्क माणसासारखे ओठ आणि दात, कोणता आहे हा अनोखा मासा? तुफान व्हायरल होतोय फोटो

कोणता आहे हा अनोखा मासा? नेटकरी चक्रावले...

(फोटो - ट्विटर )

जगभरात विविध प्रकारचे मासे आहेत हे आपल्याला माहितीये. पण सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या माशाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसणाऱ्या माशाला चक्क माणसाप्रमाणे ओठ आणि दात असल्याचं दिसतंय. त्यामुळे हे फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या माशाचा फोटो पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. या विचित्र माशाचा फोटो मलेशियामधला असल्याचं समोर आलं आहे. हा विचित्र मासा म्हणजे मलेशियामध्ये आढळणारा ‘ट्रिगरफिश’ (Triggerfish) मासा असल्याचं सांगितलं जात आहे. या माशाचे ओठ आणि दात दिसायला अगदी माणासासारखे आहेत. त्यामुळे या माशाचा फोटो तुफान व्हायरल होतोय.


खरंच माणासासारखा असा कोणता मासा असतो का? असा प्रश्न अनेक नेटकरी विचारतायेत. तर हा फोटो खोटा असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान, Triggerfish मासे सामान्यपणे दक्षिण-पूर्व आशियातील समुद्रामध्ये आढळतात अशी माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 10:58 am

Web Title: triggerfish viral pics triggers netizens curiousity with human like mouth sas 89
Next Stories
1 खरंच अमिताभ बच्चन आणि नानावटी रुग्णालयाचे आर्थिक हितसंबंध आहेत का?
2 उपचारासाठी गेला होता हॉस्पिटलमध्ये आणि नर्सच्या प्रेमात पडला, वाचा विल्यमसनची प्रेमकहाणी
3 अरे बापरे! १९६ किलोंच्या अजस्त्र गोरीलाची झाली करोना चाचणी; फोटो व्हायरल
Just Now!
X