अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान बिल्डिंगचे गुगल सर्चमध्ये नाव ‘ट्रम्प टॉवर’ ऐवजी ‘डम्प टॉवर’ असे नाव दिसू लागल्याने सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. या संपूर्ण प्रकारमागे जो कोणी आहे, त्याच्या विनोद बुद्धीची मात्र नेटीझन्सकडून दाद दिली जात आहे.

वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेवर दिवसाला खर्च होतात ६.७० कोटी रुपये

गुगलच्या गुलल मॅपमध्ये ‘ट्रम्प टॉवर’ असे सर्च केल्यास त्याजागी ‘डम्प टॉवर’ (dump) असे दिसत आहे. डम्प म्हणजे अशी जागा जिथे कच-याची किंवा टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे यावर विनोदनिर्मिती झाली नाही तर नवलच ! WPIX-TV च्या वृत्तानुसार सकाळपासून गुगल सर्चमध्ये ट्रम्प यांच्या मालकीचे हॉटेल्स आणि त्यांचे राहते घर यांची नावे गुगल सर्चमध्ये ‘Dump International Hotel and Tower’ आणि ‘Dump Tower’ असेच दिसत आहे. यामागे हॅकरचा हात असून त्याने ट्रम्प (trump) या शब्दामधील ‘टी’ आणि ‘आर’ ही अक्षरे काढून त्याजागी ‘डी’ हा शब्द घातला. त्यामुळे हा सगळा घोळ झाला आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांचे विरोधक मात्र या घोळामुळे चांगलेच सुखावले आहेत आणि या हॅकरच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत आहे.

अमेरिकने अध्यक्षपदाची निवडणुक ८ नोव्हेंबर पार पडली होती. यामध्ये अत्यंत अनेपेक्षितरित्या डोनाल्ड ट्रम्प निवडुन आले होते. त्यांच्या विजयाने अनेकांना धक्का बसला होता. आपल्या बेलगाम व्यक्तव्यांमुळे त्याने अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. या बेलगाम व्यक्तव्यामुळे ते चर्चेचा विषय बनले होते. अशातच त्यांच्या विजयामुळे नाराज झालेल्या जनतेने दुस-याच दिवशी त्यांच्या विरोधात निदर्षेने दिली होती. त्यांच्या विरोधात हजारो संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते.