News Flash

Video : विराट कोहलीचा फिटनेस पाहिलात का?? तुम्हीही थक्क व्हाल…

तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारत सज्ज

Video : विराट कोहलीचा फिटनेस पाहिलात का?? तुम्हीही थक्क व्हाल…

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवीन वर्षाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली आहे. घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर….भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही विराटसेनेने विजय मिळवला. कोहलीचा गेल्या काही सामन्यातला फॉर्म पाहता, भारतीय संघ मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरेल. हॅमिल्टनमध्ये पोहचल्यानंतर टीम इंडियाने कसून सरावाला सुरुवात केली आहे.

विराट कोहलीने जिममध्ये सराव करतानाचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर विराट आपल्या फिटनेसच्या बाबतीत किती सजग आहे हे कळून येतं.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत न्यूझीलंडला चारीमुंड्या चीत केलं. विशेषकरुन गोलंदाज आणि फलंदाजीत लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांची कामगिरी वाखणण्याजोगी होती. आगामी सामन्यात भारतीय संघ जिंकल्यास, मालिका विजयाची सुवर्णसंधी संघाकडे असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 12:40 pm

Web Title: virat kohli poested his work out video in instagram ahead of 3rd t20i vs new zealand psd 91
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 सचिन म्हणतो, न्यूझीलंड दौऱ्यात रोहितसमोर असेल ‘हे’ मोठं आव्हान
2 रिकी पाँटींगला पंटर हे नाव कोणी दिलं?? जाणून घ्या…
3 हार्दिकचं भारतीय संघातलं पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता