एकापेक्षा अधिक पॅन कार्ड तयार करून करचुकवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सरकारनं ११.४४ लाख पॅन कार्ड रद्द अथवा निष्क्रिय केली आहेत. यामध्ये आपले पॅनकार्ड आहे का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर ते तपासण्याचे काही सोपे उपाय आहेत ते करुन पाहा आणि तुमचे पॅनकार्ड फेक पॅनकार्डच्या यादीत नाही ना याची खात्री करुन घ्या

१. यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फायलिंगच्या वेबसाईटवर जावे लागेल. http://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर होम पेजवर ‘सर्व्हिसेस’ या मथळ्याखाली ‘Know Your PAN’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

२. यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, धर्म, स्टेटस यांसारखी माहिती भरुन द्यावी लागणार आहे. यामध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर भरा. जेव्हा पॅन कार्डचा फॉर्म भरताना तुम्ही जो नंबर दिला होता तोच हा नंबर आहे की नाही याची खात्री करून घ्या.

३. ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर व्हॅलिडेट या बटणावर क्लिक करा.

४. तुमच्या माहितीवर एकाहून अधिक पॅनक्रमांक रजिस्टर केलेले असतील तर तुमच्या नावावर एकाहून अधिक पॅनकार्ड असून जास्तीची माहिती द्या अशी नोटीस तुमच्या स्क्रीनवर पॉप-अप होईल. यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव किंवा इतर अनेक प्रश्न विचारण्यात येतील.

५. विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाल ज्याठिकाणी तुमचे पॅनकार्ड व्हॅलिड आहे की नाही हे समजेल.

३१ ऑगस्टपर्यंत आधारशी पॅनकार्ड संलग्न करण्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आधार कार्ड पॅन कार्डशी जोडलं नाही तर पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसंच करदात्यांची अडचण लक्षात घेऊन २०१६-१७ या वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे