लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. वैवाहिक जीवनात चांगला जोडीदार सापडला तर ठीक नाही तर आयुष्यभर स्वत:ला दोष देत जगावे लागते. अनेकदा नाते टिकवणे अवघड असते, यामुळे लोक घटस्फोटाचा मार्ग निवडतात. युरोप आणि अमेरिकन देशांमध्ये घटस्फोट ही सामान्य बाब झाली आहे. त्यामुळे या देशांमध्ये घटस्फोटाच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील १० देशांची यादी जाहीर केली आहे जिथे घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पोर्तुगालमध्ये १०० पैकी ९४ जोडप्यांचा घटस्फोट होतो. मात्र, या यादीत भारत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. येथे फक्त १ टक्के लोक घटस्फोट घेत आहेत. पण इतर देशांमधील घटस्फोटाच्या घटनांबाबत काय स्थिती आहे जाणून घेऊ…

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, एकट्या पोर्तुगालमध्ये घटस्फोटाचे प्रमाण हे तब्बल ९४ टक्के आहे. म्हणजेच येथे १०० जोडप्यांपैकी फक्त ६ जोडप्यांना आपले लग्न टिकवता येत आहे. इथल्या स्त्रियांसाठी घटस्फोट ही सामान्य बाब असून त्यांच्याकडे कोणत्याही तिरस्काराच्या नजरेने पाहिले जात नाही. युरोपातील या देशातील सुमारे ८७ टक्के महिला सिंगल पॅरेंट आहेत. म्हणजेच त्या एकट्याच आपल्या मुलांची काळजी घेतात.

घटस्फोटाच्या बाबतीत स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये १०० पैकी ८५ जोडपी आयुष्यभर आपलं लग्न टिकवू शकत नाहीत. ज्यामुळे ते घटस्फोट घेतात. इतर युरोपीय देशांप्रमाणेच स्पेनमध्येही घटस्फोटाचे प्रमाण अलीकडच्या काळात झपाट्याने वाढतेय. यात स्पेनमध्ये ७ जुलै १९८१ पासून एक कायदा लागू करण्यात आला ज्यात महिलांना पतीच्या संपत्तीमध्ये अनेक अधिकार देण्यात आले आहेत.

लग्नाचे नाती तोडण्यात लक्झेंबर्ग तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सच्या आकडेवारीनुसार, लक्झेंबर्ग घटस्फोटाचे प्रमाण ७९ टक्के आहे. पण स्थानिक मीडिया रिपोर्टमध्ये हा आकडा थोडा कमी आहे. लक्झेंबर्ग हा एक छोटासा देश असला तरी खूप श्रीमंत आहे. इथल्या लोकांकडे संपत्तीची कमतरता नाही, पण ते नातेसंबंध सांभाळण्यात असमर्थ ठरत आहेत.

हेही वाचा : चमत्कारच! आईच्या पोटातच बाळाच्या मेंदूवर झाली शस्त्रक्रिया, दोन दिवसांनी झाला त्याचा जन्म

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, घटस्फोटाच्या बाबतीत रशिया चौथ्या क्रमांकावर आहे. रशियामध्ये सध्या घटस्फोटाचे प्रमाण ७३ टक्के आहे. या देशात गेल्या काही काळापासून नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. यात कारणामुळे गेल्या काही वर्षांत रशियामध्ये घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

युद्धग्रस्त युक्रेन यात पाचव्या क्रमांकावर आहे. युक्रेनमध्ये ७० टक्के विवाह हे नंतर घटस्फोटात बदलतात. येथील लोक लवकर लग्न करतात, यामुळे त्यांना त्यांचे लग्न जास्त वेळ टिकवणे अशक्य होत नाही, असे मानले जाते. दारूचे व्यसन, जोडीदारावरील अविश्वास आणि घटस्फोटाची सुलभ प्रक्रिया या कारणांमुळे युक्रेनमध्ये घटस्फोटाची संख्या वाढतेय.

कम्युनिस्ट देश क्युबा यात सहाव्या क्रमांकावर आहे. या देशात ५५ टक्के म्हणजेच जवळपास निम्म्या लोकांचा घटस्फोट झाला आहे. या देशात नातेसंबंधांबाबत सरकारचे नियम अतिशय कडक आहेत. नाते तुटण्याचे हे देखील एक कारण सांगितले जाते. तसेच आपुलकीचा अभाव, विवाहबाह्य संबंध, नातेसंबंधांमधील फसवणूक ही देखील घटस्फोटाची कारणे आहेत.

जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. क्युबाप्रमाणे या देशातील घटस्फोटाचे प्रमाण ५५ टक्के आहे. सातत्याने बिघडत चाललेल्या नातेसंबधांमुळे येथील सरकार इतके कंटाळले आहे की, लोकांना रोखण्यासाठी कायदा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा एक श्रीमंत देश असून येथील लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, पण घटस्फोट ही या देशात नवीन समस्या बनत आहे.

सर्वाधिक घटस्फोट घेणाऱ्यांच्या यादीत बेल्जियम आठव्या क्रमांकावर आहे. येथे दर १०० पैकी ५३ लोक घटस्फोट घेतात. पण इथली आणखी एक खास गोष्ट म्हणजे, येथील लोकं आपले नातं फार काळ टिकत नाही. पण पुढाकार घेणारे लोक खूप खास मानले जातात. गेल्या काही वर्षांत येथे घटस्फोटाच्या केसेस झपाट्याने वाढल्या आहेत.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, फ्रान्समध्ये घटस्फोटाचे प्रमाण ५१ टक्के आहे. येथील लोक खूप उदारमतवादी मानले जातात. स्त्री असो वा पुरुष, त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास निर्माण करणे कठीण होत आहे. हे थांबवण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात जर आपण आपल्या भारताबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात सर्वात कमी घटस्फोटांची संख्या आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सच्या डेटामध्ये आपला देश घटस्फोटांच्या घटनेत शेवटच्या स्थानावर आहे. येथे घटस्फोटाचे प्रमाण केवळ १ टक्के आहे. काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, गेल्या काही वर्षांत येथेही घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.