Lion Vs Cobra Face Off Video : सोशल मीडियावर वन्यप्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओंमधून वन्य जीवांसंबंधित अनेक रंजक गोष्टी आपल्या समोर येतात. यातील काही दृश्य फारचं चकित करणारी असतात. अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात साप आणि सिंह आमनेसामने आल्याचे दिसतेय. जंगलातील हे दोन धोकादायक प्राणी एकमेकांसमोर आल्यानंतर काय करू शकतात हा विचार करूनच भीती वाटली न! पण, या व्हिडीओत काहीसं वेगळं दृश्य पाहायला मिळतेय, जे पाहून तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल.
सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. पण, साप राजा नसला तरी त्याला भलेभले प्राणी घाबरतात. कारण साप कितीही मोठा प्राणी असो, त्यावर हल्ला करून क्षणात त्याचा जीव घेऊ शकतो. या व्हिडीओत एका सापाने चक्क जंगलच्या राजाचाच बाजा वाजवला आहे, कारण व्हिडीओत एका सापाला घाबरून दोन सिंह आल्या पावली पळत होते.
व्हिडीओत पाहू शकता, रस्त्याच्या कडेला एक किंग कोब्रा जातीचा साप सऱड्याची शिकार करत होता, यावेळी सापाचं लक्ष रस्त्यावरून जाणाऱ्या सिंहाच्या जोडीकडे गेलं, साप सरड्याला सोडून थेट सिंहाच्या जोडीसमोर आला. यानंतर साप फणा काढत सिंहांच्या दिशेने जाताच दोघं घाबरले अन् ते मागे सरकू लागले. यानंतर दोघांमध्ये लढाई होते की काय असे वाटू लागले, पण सिंह मागे पळताच सापही आल्या पावली परत गेला. यानंतर एक सरडा सिंहासमोर आला, पण त्याच्याशीदेखील सिंह सावधपणे वागत होते. एका विषारी सापानंतर सिंहांना त्या असहाय्य सरड्याबरोबर कोणताही धोका पत्करायचा नव्हता, त्यामुळे सरड्याला वाट मोकळी करून देत तेही आपल्या मार्गाने निघून गेले. सरड्याचे नशीब म्हणून सिंहांनी त्याला जाऊ दिलं.
साप आणि सिंहांच्या या व्हिडीओबद्दल @daniel_wildlife_safari ने लिहिले – आयुष्यात एकदाच असे दृश्य पाहायला मिळाले, सिंह विरुद्ध कोब्रा विरुद्ध सरडा! हे सिंह सापासारख्या प्राण्याशी भिडले. या सगळ्या गोंधळात, एक सरडाही तिथून कुठूनतरी आला! तो पण मृत्यूपासून एकदा नव्हे तर दोनदा वाचला!