गरोदर आईची कशी काळजी घेतेय पाहा ही चिमुकली; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं | 2 year old little girl takes care of her pregnant Mother Viral video will definitely melt your heart | Loksatta

गरोदर आईची कशी काळजी घेतेय पाहा ही चिमुकली; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये चिमुकली गरोदर आईची कशी काळजी घेतेय एकदा पाहाच

गरोदर आईची कशी काळजी घेतेय पाहा ही चिमुकली; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं
गरोदर आईची काळजी घेणाऱ्या या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, लहान मुलांच्या निरागसतेचे वर्णन करणारे हे वाक्य तुम्ही नेहमी ऐकले असेल. लहान मुलं कोणतीही गोष्ट पटकन शिकून घेतात, त्यांना नीट समजावले की त्यांना लगेच त्या गोष्टीचे महत्त्व किंवा गांभीर्य समजते. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांच्या मनात कोणाबाबतही इर्षा निर्माण होत नाही, त्यांची निरागसता अनेकदा आपल मनं जिंकते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या गरोदर आईची काळजी घेत असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी घरात खेळत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ शूट करणारी आई गरोदर असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे. ही चिमुकली कशी काळजी घेते, हे दाखवण्यासाठी व्हिडीओ शूट करणारी तीची आई मुद्दामुन प्लेट खाली पाडते. हे समजताच ही लहान मुलगी धावत आईजवळ येते आणि प्लेट उचलायचा तीची मदत करते. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता

व्हायरल व्हिडीओ:

या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओला १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 14:39 IST
Next Story
लग्नात ‘डिजिटल शगुन’ ची भन्नाट कल्पना! रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच