TCS Recruitment 2024 : टीसीएसमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. TCS BPS 2024द्वारे पदवीधरांसाठी भरती मोहीम आयोजित केली आहे. २०२४च्या पदवीधरांना TCS BPS फ्रेशर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवीधरांसाठी ही भरती मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या भरती मोहिम इच्छूक उमेदवार १४ एप्रिल २०२४ पुर्वी नोंदणी करू शकतात.

TCS BPS भरतीसाठी अर्ज प्रक्रिया

जे विद्यार्थी TCS BPS भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी खालील लिंकवर नोंदणी करणे अनिवार्य आहे:

IPL 2025
IPL 2025: फ्रँचायझींच्या तीन मोठ्या मागण्या, ५ वर्षांनी होणार महालिलाव? RTM बाबतही संघमालक आग्रही
malpractice, MPSC examination, students
एमपीएससी परीक्षांमध्येही प्रमाणपत्रांचे गैरप्रकार? एमपीएससीचे म्हणणे काय?
Student Protest in Bangladesh demand to remove reservation in jobs
बांगलादेशात आंदोलनाचा भडका;  नोकऱ्यांतील आरक्षण हटविण्याची मागणी, हिंसाचारात १८ ठार
India Post GDS Recruitment 2024
India Post GDS Recruitment 2024 : ४४,०० पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी होणार भरती, लवकर करा अर्ज, जाणून घ्या पात्रता-निकष
mahavitaran power purchase in controversy modification in tender process for convenience of a company
महावितरणची वीज खरेदी वादात; निविदा अटींमध्ये एका कंपनीच्या सोयीसाठी बदल केल्याची चर्चा
Mumbai police recruitment marathi news
मुंबई पोलीस भरतीमधील मुख्य आरोपी पुन्हा मैदानी चाचणीमध्ये? विद्यार्थी संघटनेचा आरोप काय…
Committee, Flamingo, Habitat,
फ्लेमिंगो अधिवास, कांदळवन संरक्षणासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; समितीला दोन महिन्यांच्या आत अहवाल देण्याचे आदेश
Recruitment, MPSC,
‘एमपीएससी’कडून सरळसेवा भरती, फडणवीसांच्या घोषणेमुळे समाधान, मात्र ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन…

येथे क्लिक करा – https://nextstep.tcs.com/campus/#/

  • १ TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉगऑन करा.
  • २ वैयक्तिक तपशील भरा
    • आधार क्रमांक,
    • आधार कार्ड नुसार नाव,
    • आधार कार्डानुसार जन्मतारीख. या गोष्टी भरणे अनिवार्य आहे.
      कृपया तपशील कोणत्याही त्रुटीशिवाय माहिती भरल्याची खात्री करा आणि अर्ज सबमिट करा. चुकीचा तपशील जमा केल्यामुळे तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
  • ३. नोंदणी – TCS BPS भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
    • जर तुम्ही नोंदणीकृत युजर असाल, तर कृपया लॉग इन करा आणि अर्ज भरा. अर्ज जमा केल्यावर, कृपया ‘Apply for Drive’’ वर क्लिक करा
    • तुम्ही नवीन युजर असल्यास, कृपया आता नोंदणी करा वर क्लिक करा, ‘BPS’ म्हणून श्रेणी निवडा आणि तुमचे तपशील भरा. तुमचा अर्ज सबमिट करा आणि ‘‘Apply for Drive’’वर क्लिक करा.
      शैक्षणिक तपशील, इंटर्नशिप, कामाचा अनुभव, असल्यास TCS अर्जामधील तपशील पूर्ण आणि अचूक असल्याची खात्री करा.
  • ४. तुमचा चाचणी पद्धत(इन-सेंटर) निवडा आणि तुमचे पसंतीचे चाचणी केंद्र निवडा आणि नंतर Apply वर क्लिक करा. कृपया लक्षात ठेवा, एकदा निवडलेले परीक्षा केंद्र बदलले जाऊ शकत नाही
  • ५. तुमच्या अर्जाचा स्टेटस जाणून घेण्यासाठी ‘Track Your Application’ तपासा. स्थिती ‘Applied for Drive’ म्हणून दिसली पाहिजे.

अर्जाची लिंक – https://www.tcs.com/careers/india/tcs-bps-fresher-hiring-2024

हेही वाचा – BOI Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजचं करा अर्ज

महत्त्वाची सूचना:

  • कृपया लक्षात घ्या की ही केंद्रामध्ये घेतली जाणीर परीक्षा आहे.
  • संबंधित केंद्रांमधील जागांचे वाटप ‘प्रथम-येणाऱ्या प्राधान्य’ या तत्त्वावर केले जाईल आणि त्यामुळे तुमची पसंती चाचणी केंद्र निवडण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करणे आणि अर्ज करणे महत्त्वाचे आहे. एकदा जागा भरल्यानंतर पसंतीच्या शहराची निवड प्रतिबंधित केली जाईल (आधीच जागा भरल्या असल्यास तुम्ही तुमचे पसंतीचे शहर निवडू शकणार नाही).
  • तुमच्याकडे सर्व मूळ शैक्षणिक दस्तऐवज (मार्कशीट्स, पदवी प्रमाणपत्र, इंटर्नशिप लेटर, कार्यानुभव पत्र असल्यास) असणे आवश्यक आहे.
  • चाचणीशी संबंधित संवाद ‘ ‘TCS iON – Our Test Provider’ द्वारे तुमच्याशी शेअर केला जाईल.
  • TCS Gmail, Rediff mail, Yahoo Mail, Hotmail इ. सारख्या अनधिकृत ईमेल आयडींवरून नोकरीच्या ऑफर / नोकऱ्याशी संबंधित कोणतेही माहिती पाठवत नाही.
  • TCS उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी किंवा नोकरीच्या ऑफरसाठी कोणतेही पैसे जमा करण्यास सांगत नाही.
  • TCS कोणत्याही बाह्य एजन्सी/कंपनीशी कोणत्याही मुलाखती घेण्यासाठी किंवा नोकरीच्या ऑफर देण्यासाठी संबद्ध नाही.

मदतीसाठी येथे संपर्क साधा

कोणत्याही मदतीसाठी, कृपया TCS TAG हेल्पलाइन टीमशी संपर्क साधा. ईमेल आयडी: tcsbps.support@tcs.com | टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक: १८००२०९३१११