Record of clapping : तुम्ही एका सेकंदात किती टाळ्या वाजवू शकता. एक, दोन किंवा जास्तीत ७ कदाचित. पण, एका २० वर्षीय तरुणाने प्रति सेकंद १९ टाळ्यांच्या हिशोबाने १ मिनिटामध्ये १ हजार १४० टाळ्या वाजवून नवा गिनीज रेकॉर्ड बनवला आहे.

एली बिशप यांच्या नावे एक मिनिटांमध्ये सर्वाधिक टाळ्या वाजण्याचा विक्रम होता. हा विक्रम डाल्टन मेयर या २० वर्षीय तरुणाने मोडीत काढला आहे. डाल्टनने एका मिनिटात १ हजार १४० किंवा प्रति सेकेंद १९ टाळ्या वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे. डाल्टनने यापूर्वीचा विक्रम ३७ टाळ्यांनी मोडला आहे.

(Viral pic : ऑटोमध्ये चक्क सनरूफ! फोटो पाहून नेटकरी अवाक)

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, १२ मार्च २०२२ रोजी यूएस येथील डाल्टन मेयरने हा विक्रम केला. डाल्टनने शाळेत असताना एका मिनिटात सर्वाधिक टळ्यांचा विक्रम बघितला होता आणि तेव्हापासून तो हा विक्रम मोडण्यासाठी प्रयत्न करत होता.

क्वाड सिटी टाइम्सनुसार, प्राथमिक शाळेत शिकत असताना डाल्टनला वेगाने टाळ्या वाजवण्याबाबत माहिती मिळाली. त्याने यूट्यूबवर केंट फ्रेंचचा व्हिडिओ बघितला होता. केंट यांना जगातील सर्वात वेगवान टाळ्या वाजवणारी व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या व्हिडिओमुळे वेगाने टाळ्या वाजवणे शिकण्याची इच्छा झाली, असे डाल्टन सांगतो. हे नैसर्गिकरित्या मला आले. काही कारणास्तव हे कसे करायचे मला माहिती होते, असे डाल्टनचे म्हणणे आहे.

(Viral : आरआरआरची जपानी यूट्यूबरलाही भुरळ, ‘नाटू नाटू’ गाण्यावर केले अफलातून नृत्य, पाहा व्हिडिओ)

डाल्टन एली बिशप यांनी शोधलेल्या व्रिस्ट क्लॅपिंग पद्धतीचा वापर करतो. बिशप यांच्या नावे एका मिनिटांत १ हजार १०३ टाळ्या वाजवण्याचा विक्रम होता. तळहातांवर मनगट आणि बोटांचा वापर करून टाळ्या वाजवण्याच्या प्रकाराला व्रिस्ट क्लॅपिंग म्हणतात.