24 carat gold ice cream: सोशल मीडियावर अनेक हटके गोष्टी या व्हायरल होत असतात. अशीच एक भन्नाट गोष्ट आता समोर आली आहे. आतापर्यंत तुम्ही सोन्याच्या मिठाईबद्दल ऐकले असेलच, पण आता बाजारात गोल्ड प्लेटेड कुल्फी देखील आली आहे. अनेकदा सोन्याचं नाव ऐकलं की आपल्या मनात सोनायचे दागिने येतात. पण तुम्हाला २४कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या कुल्फीबद्दल सांगितलं तर तुम्ही नक्कीच गोंधळून जाल. उन्हाळ्यात आता आईस्क्रीमप्रेमींना २४ कॅरेट सोन्याचे आईसस्क्रीम खाण्याची संधी मिळत आहे.

इंदोरमध्ये एका स्ट्रीट वेंडरने ‘गोल्ड कुल्फी’ नावाची एक कुल्फी विकणं सुरू केलं आहे.  या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हे गोल्ड प्लेटेड कुल्फी बनवताना दिसत आहे. ही कुल्फी वेगवेगळ्या टेस्टमध्ये मिळते, मँगो, पिस्ता आणि सिंपल अशा विविध प्रकारच्या टेस्टमध्ये ही कुल्फी मिळत आहे. विशेष म्हणजे हा कुल्फी विक्रेता स्वत:ही सोन्याचे दागिणे घालून ही कुल्फी विकत आहे. तुम्ही पाहू शकता याच्या गळ्यात मोठी सोन्याची चैन, हातात अंगठ्या, सोन्याचं मोठं कडं आहे. यामुळे हा कुल्फीवाला जास्त आकर्षित करत आहे. दरम्यान फूड ब्लॉगर विक्रेत्याला विचारतो की, ही कुल्फी इतकी महाग का आहे? तर यावर त्याने सांगितलं की, या कुल्फीला सोन्याचा अर्क लावला जातो. त्यामुळे याची किंमत जास्त आहे.

पाहा सोन्याची कुल्फी

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले रॉकस्टार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला नवा लूक पाहिलात का?

सोन्याच्या कुल्फीची किमंत किती –

आतापर्यंत आपण कुल्फी खाल्लीच आहे, मात्र या खास अशा सोन्याच्या कुल्फीची किमंत नेमकी किती असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर या कुल्फीची किमंत आहे ३५१ रुपये. सोन्याचा अर्क लावल्यामुळे या छोट्याश्या कुल्फीला चांगलाच भाव आलाय.

या व्हिडीओला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोक ही कुल्फी खाण्यासाठी फारच उत्साहीत आहेत. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या कैलाश सोनीने कॅप्शनमध्ये या कुल्फीवाल्याचा पत्ता दिला आहे. प्रकाश कुल्फी, लोकेशन- सराफा बाजार, इंदौर, मध्य प्रदेश, इंडिया. तुम्हालाही ही सोन्याची कुल्फी खायची असेल तर नक्की भेट द्या.