24K Gold Dal Fry: तुम्ही अनेक हॉटेलमध्ये वेगवेगळ्या चवींची डाळ फ्राय खाल्ली असेल. वेगवेगळ्या राज्यांनुसार डाळीचे प्रकार चव बदलते. मात्र तुम्ही कधी २४ कॅरेट सोन्याची फोडणी घातलेली ‘दाल फ्राय’ कदाचित चाखली नसेल. ही ‘दाल फ्राय’ कुठे मिळते आणि या अनोख्या डीशची किंमत किती आहे? चला जाणून घेऊयात. या डीशचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या पदार्थाला ‘२४ कॅरेट गोल्ड दाल फ्राय’ असं म्हटलं जातं. हा पदार्थ दुबईमध्ये विकला जातो. खरं तर ही आपल्या सर्वांच्या घरात तयार होणारी नेहमीचीच उडदाची डाळ आहे. ज्यावर मिरची आणि मोहरीची फोडणी घातली जाते. पण लक्षवेधी बाब म्हणजे या डाळीवर तेलाची नव्हे तर चक्क २४ कॅरेट सोन्याची फोडणी घातली जाते. मिळालेल्या माहितीनुसार या एक वाटी डाळीची किंमत तब्बल २५ हजार रुपये इतकी आहे. अर्थातच १० ग्रॅम सोनं ६४ हजार रुपयांना विकलं जातंय. या पार्श्वभूमीवर विचार करता या डाळीत किमान दोन-चार ग्रॅम सोनं टाकलंच जात असेल.

हा व्हिडीओ आतापर्यंत १४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. आजपर्यंत तुम्ही अशी डाळ फ्राय कुठेही खाल्लेली नाही. त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की खाऊन बघा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> धावती ट्रेन पकडताना तोल गेला अन् ‘तो’ फटीत पडला; प्लॅटफॉर्म फोडला पण शेवटी…थरारक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या डाळीचा व्हिडीओ mr.random4090 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे, तर व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी याला स्वादिष्ट म्हटले आहे. तर या डीशची किंमत सोन्याचा भाव पाहता खूपच कमी आहे असं एका युजर्सने म्हटलं आहे.