पिरॅमिडसाठी प्रसिद्ध असलेल्या इजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञांच्या हाती गेल्या ५० वर्षांतील सर्वात मोठे यश आले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन इजिप्शियन राजा फारोच्या ६ हरवलेल्या सूर्यमंदिरांपैकी एक सापडले आहे. देशातील एका वाळवंटी भागात उत्खननादरम्यान हे सूर्यमंदिर सापडले आहे. असे पहिले सूर्यमंदिर सुमारे ५० वर्षांपूर्वी उत्खननात सापडले होते. राजा फारो जिवंत असताना त्याला देवाचा दर्जा देण्यासाठी ही मंदिरे बांधण्यात आली होती.

असे मानले जाते की अशी केवळ ६ मंदिरे बांधली गेली होती आणि आतापर्यंत फक्त दोन मंदिरे उत्खननामध्ये सापडली होती. आता हे तिसरे मंदिर आहे. अबू गोराब परिसरात उत्खननादरम्यान हे मंदिर सापडले आहे. हे सूर्यमंदिर न्युसेरे इनी यांनी बांधले होते. ते एक फराओ होते ज्यांनी २४ ते ३५ वर्षे राज्य केले. त्यांची कारकीर्द २५ ईसापूर्व होती. त्यांना पाचवे राजवंश म्हणतात.

sukma ram mandir
छत्तीसगडमधील माओवाद्यांनी बंद केलेले राम मंदिर २१ वर्षांनी खुले
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

( हे ही वाचा: अबब! माशाने गिळला १ मीटर लांबीचा साप; हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच )

चिखलाने भरलेली बिअरची भांडी सापडली

हे सूर्यमंदिर मातीच्या विटांनी बांधले होते. यावरून येथे पूर्वी आणखी एक वास्तू अस्तित्वात असल्याचेही दिसून येते. “आम्हाला माहित आहे की मंदिराच्या दगडाखाली काहीतरी आहे,” इजिप्तशास्त्रज्ञ डॉ मॅसिमिलियानो नुझोलो म्हणतात. किंबहुना, तेथे एक मोठे प्रवेशद्वार आहे जे दुसरी इमारत अस्तित्वात असल्याचे सूचित करते. पुरातत्वशास्त्रज्ञांनी तेथून ढिगारा काढला तेव्हा तेथे पायाचे दोन फूट सापडले, जे चुनखडीच्या खांबाचे होते.

( हे ही वाचा: वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य )

येथून चिखलाने भरलेली बिअरची भांडीही सापडली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की ही भांडी तेथे मंदिर अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे. ही बरणी त्या ठिकाणी ठेवली जात होती ज्या त्या काळी लोक अतिशय पवित्र मानत असत. विद्वानांचे म्हणणे आहे की हे पुरावे असे सूचित करतात की हे दुर्मिळ सूर्य मंदिर होते. डॉ नुझोलो म्हणतात, ‘माझ्याकडे आता बरेच पुरावे आहेत की आम्ही येथे हरवलेल्या सूर्यमंदिराचे उत्खनन करत आहोत. ही मंदिरे अत्यंत शक्तिशाली सूर्य देवतासाठी बांधली गेली होती. जे पिरॅमिडसारखं दिसतं .