आता कुठे गुलाबी थंडीची जादू हळूहळू वातावरणात पसरू लागली आहे. अशा थंडीत उबदार चादरीत मनसोक्त झोपायला कोणाला नाही आवडणार? थंडीच्या दिवसात सकाळी कितीही उठण्याचा प्रयत्न केला तरी उठावेसे वाटत नाही. त्यातून असा आराम सोडून कामाला जायचे म्हणजे अनेकांसाठी शिक्षाच. या दिवसात जास्त झोप लागणे, थकवा जाणवणे किंवा उठण्यास कंटाळा येणे ही प्रत्येकांची समस्या आहे. अशा वेळी या गुलाबी थंडीत आळस झटकून टाकण्यासाठी काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.

वाचा : रात्री ‘हे’ पदार्थ खाणे आवर्जुन टाळा

* थंडीच्या दिवसात आळस झटकण्याचा उत्तम पर्याय म्हणजे सूर्यप्रकाश. वातावरणात थंडावा असतो अशावेळी सकाळची कोवळी सूर्यकिरणे अंगावर पडली की आळस कुठच्या कुठे पळून जातो.
* व्यायाम हा थंडीच्या दिवसात थकवा घालवण्याचा उत्तम उपाय आहे. आधीच व्यायम म्हटल्यावर आपल्या कपाळाला आठ्या पडतात त्यातून थंडीच्या दिवसात व्यायाम करणे म्हणजे सगळ्यात कठीण काम. पण दिवसभराचा थकवा घालवायचा असेल तर व्यायाम हा उत्तम पर्याय आहे.
* रात्रीच्या वेळी जड पदार्थ खाणे टाळा. शक्यतो झोपण्यापूर्वी तीन तास आधी काहीच खाऊ नका.
* गाजर, संत्री, मोसंबी, मटार यासारख्या हिवाळ्यात येणा-या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.
* हिवाळ्यात ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही थकावा जाणवू शकतो. अशावेळी ‘ड’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांच्या आहारात समावेश करून घ्या.
* झोपण्यापूर्वी एक तास आधी पंखे किंवा एसी पूर्णपणे बंद ठेवा. त्यामुळे थंडीच्या दिवसात घर उबदार राखण्यास मदत होते.
* थंडीच्या दिवसात आधीच सूर्यप्रकाश कमी असतो त्यातून वातावरणात गारवा असतो त्यामुळे मनही काहीसे खिन्न आणि उदास असते अशा वेळी दिवसाची सुरूवात छान गाणी ऐकून करा. तितकेच प्रसन्न वाटते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : ग्रीन टी बनवताना ‘या’ चुका करू नका