हातात खेळण्यातलं विमान घेऊन ते उडवणारी तुम्ही अनेक लहान मुलं पाहिली असतील. इतक्या अजाणत्या वयात हातात खेळण्यातलं विमान घेऊन ते घरभर फिरवायचं आणि ‘मला की नाही पायलट व्हायचं’ आहे असे सांगणारी अनेक मुलं आहेत. पण एका शाळेत जाणाऱ्या मुलाने वयाच्या सहाव्याचं वर्षी पायलट होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं. ‘एतिहाद एअरवेज’न त्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२१ वर्षांपूर्वी वडिलांची हत्या; पित्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ती’ न्यायाधीश झाली

अॅडम मोहम्मद आमीर असं त्याचं नाव असून कॉकपीटमध्ये सहवैमानिकाची जबाबदारी पार पाडतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे. एवढ्याशा मुलाला विमानातली एकूण एक माहिती असल्याचे पाहून एतिहाद एअरवेजचे वैमानिकही आश्चर्यचकित झाले. अॅडम काही सामान्य मुलगा नाही, हे त्यांनी हेरलं आणि छोट्या अॅडमला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. त्याने व्हिडिओ पाहून, मासिकांमधली माहिती वाचून विमानाबद्दल सारी माहिती मिळवली होती. त्याचं विमानबद्दलचं कमालीचं ज्ञान पाहून एतिहाद एअरवेजनं त्यांला एकदवसीय सहवैमानिकाचं पद दिलं. वैमानिकाच्या सूचना ऐकून विमान चालवणाऱ्या अॅडमचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

विकृतपणाचा कळस! ‘हे’ इन्स्टाग्राम अकाऊंट पाहून प्रत्येक महिलेला चीड येईल

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 year old pilot co flying an aircraft video goes viral
First published on: 19-10-2017 at 10:00 IST