दिल्ली मेट्रो नेहमी चर्चेत असते. कधी मेट्रोमध्ये लोक बसण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून भांडतात तर कधी मेट्रोमध्ये डान्स करतात, रिल शुट करतात. सध्या दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत आली आहे यावेळी कारण मात्र वेगळे आहे. एका १६ वर्षाच्या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत दिल्ली मेट्रो प्रवासा दरम्यान घडलेला भयानक अनुभव सांगितला आहे. तरुणाच्या पोस्टनुसार, दिल्ली मेट्रोमध्ये एका प्रवाशांने त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पाठलाग देखील केला. ही घटना शुक्रवारी राजीव मेट्रो स्टेशनवर घडल्याचे त्याने सांगितेल.

भव्य नावाच्या एक्स खात्यावर एका तरुणाने दिल्ली मेट्रोमध्ये आलेला भयानक अनुभव सांगितला. X वरील पोस्टच्या मालिकेत, १६ वर्षाच्या मुलाने लिहिले, “दिल्ली मेट्रोमध्ये राजीव चौक स्टेशनवर माझ्याबरोबर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मी १६ वर्षांचा मुलगा आहे आणि मी मेट्रोमध्ये एकटाच प्रवास करत होतो. मी रात्री८.३० ते ९.३० दरम्यान राजीव चौक स्थानकातून समयपूरच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोमध्ये चढलो. मेट्रोच्या आत असताना सहप्रवाशाने त्याच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला.

आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की “मी ट्रेनमध्ये प्रवेश करताच मला काहीतरी जाणवले, पण ही कोणाची तरी बॅग असावी किंवा कोणीतरी मला चुकून स्पर्श केला आहे असे समजून मी ते हटवले. परंतु माझं अंदाच चुकीचा ठरला. मी एक मिनिट थांबलो आणि तो व्यक्तीने हाताने प्रायव्हेट पार्ट दाबत असल्याचे जाणवले, मी घाबरलो होतो”

त्या व्यक्तीने आपल्याला वारंवार स्पर्श केल्याचा आरोप करत तरुण म्हणाला की, “त्याने पुन्हा तिसऱ्यांदा ते केले.. माझी सहनशक्ती संपली आणि मी त्याचे केस पकडले आणि त्याचा फोटो क्लिक केला. मी घाबरलो होतो आणि थरथरत होतो पण तरीही मी ते केले. त्यानंतर, मी तिथे थोडा वेळ थांबलो, आणि त्याने वाद घालण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा – रोज शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षावाल्या काकांना तरुणीने दिली खास भेट! त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद एकदा बघाच! Viral Video

मुलाने त्या व्यक्तीचा फोटोही शेअर केला आहे. मुलाने सांगितले की जेव्हा तो मेट्रोतून खाली उतरला, पण त्या माणसाने त्याचा पाठलाग देखील केला.

आपल्या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिले की, “मी माझ्या स्टेशनवर (कश्मीरी गेट) पोहोचताच, मी बाहेर पडलो आणि त्याला फसवण्याचा प्रयत्न करत विरुद्ध मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, आणि ते काही काळ सुरु होते, पण शेवटी मला यलो लाईनवर जावे लागले आणि त्याने मला पकडले. मी शक्य तितक्या वेगाने एस्केलेटरवर चढलो.

हेही वाचा –हक्काचा भाऊ! शहीद सैनिकाच्या मुलीच्या लग्नात सीआरपीएफ जवानांनी पार पाडले भावाचे कर्तव्य, पाहा फोटो

“तो माझ्या मागे येणार असल्याचा इशाला त्याने मला केला आणि एस्केलेटरवर जात असताना मी त्याला पाहत होतो. तो देखील एस्केलेटरवर चढला, पण मी जितक्या वेगाने पळता येईल तितक्या वेगाने पळत राहिलो. मी जीव वाचवण्यासाठी पळत सुटलो. शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचलो.”

मुलाने सांगितले की,”त्याला एका गार्डने पुढच्या ट्रेनमध्ये नेले, त्यानंतर तो घरी पोहोचलो.”

हेही वाचा – माकडाचा राजेशाही थाट! टेबल खुर्चीवर बसून ताटात जेवणाऱ्या माकडाचा Video Viral

नंतर, एक अपडेट शेअर करत मुलाने सांगितले की, राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या अधिकाऱ्याने त्याच्याशी संपर्क साधला आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.