सध्याच्या तरुणाईला रील्सच बनवण्याचं वेड किती आहे, हे सांगण्याची गरज नाही. वेगवेगळ्या पद्धतीची रील्स शूट करुन ती सोशल मीडियावर अपलोड करायला अनेकांना आवडतं. शिवाय आपलं रील इतरांपेक्षा थोड वेगळ आणि भन्नाट असावं यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो. मात्र अनोखे रील बनवण्याच्या नादात अनेकजण जीवघेणे आणि धोकादायक स्टंट करायलादेखील मागेपुढे पाहात नाहीत. त्यामुळे असे रील्स बनवताना अनेकांचे अपघातदेखील होतात, अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. तरीही काही लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी रील बनवणं थांबवत नाहीत. सध्या एका महिलेचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ती धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला स्कूटीवरून उडी मारताना दिसत आहे. शिवाय यावेळी तिने साडी नेसली असून डोळ्यांना पट्टीदेखील बांधल्याचं दिसत आहे. डोळ्यांना पट्टी बांधल्यानंतर ती स्कूटीच्या मागच्या सीटच्या काठावर उभी राहते आणि हवेत उलटी उडी मारते. उडी मारल्यानंतर ती जमिनीवर उभं राहण्याचा प्रयत्न करते, परंतु तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरतो, कारण शेवटच्या क्षणी तिचा थोडक्यात तोल गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही पाहा- मंदिर परिसारातील चिमुकलीच्या डान्सने जिंकली नेटकऱ्यांची मनं, मनमोहक Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओतील महिला अनोखा आणि धोकादायक स्टंट करत असतानाचा हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर ५ लाखांहून अधिक युजर्सनी तो लाईक केला आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंटदेखील यूजर्स करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “साडी नेसून केलेले हे निरुपयोगी नाटक आहे”. तर दुसऱ्या युजरने लिहिले, “फक्त लाईक्ससाठी धोका पत्करणे म्हणजे वेडेपणा आहे”. तर काही नेटकरी या मुलीच्या स्टंटच कौतुकदेखील करत आहेत.