Bone Got Stuck In Tigers Tooth : वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत राहतात, मात्र यातील काही व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत. जंगलात शिकार करताना प्राणी अनेकदा खूप क्रूर होतात आणि क्षणार्धात भक्ष्याचे चिरफाड करतात आणि गिळतात, परंतु काही वेळी हिंस्र प्राणी भक्ष्याची शिकार करण्याच्या नादात स्वत:ला संकटात टाकतात. नुकताच असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, “शिकारीवर ताव मारताना वाघाची जी अवस्था झाली आहे ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.”

वाघाच्या दातात दातात अडकलेले हाड काढण्यासाठी हातोड्याचा केला वापर

भक्ष्यावर ताव मारणाऱ्या वाघाच्या दातांमध्ये हाडाचा एक मोठा तुकडा अडकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर वाघावर उपचार करताना दिसत आहे. वाघाच्या दातात अडकलेले हाड काढण्यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू आहे. दरम्यान ते हाड काढण्यासाठी हातोड्याचा वापर करत आहे. वाघाच्या दातावर हातोड्याने उपचार करताना डॉक्टरांना सुटला घाम. या घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे अवघ्या १६ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २७.८ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे, तर १ लाख४० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १६ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २७.८ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे, तर १ लाख ४० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

हेही वाचा – शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली १० हजार किलोंची मिसळ; अजित पवार अन् चंद्रकांत पाटलांनीही मारला ताव, पाहा Video

हा धक्कादायक व्हिडिओ शेअर करताना, ‘वाघाच्या दातात अडकलेले हाड काढताना पशुवैद्यकीय डॉक्टर’ असे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या युजरने लिहिले की, बाबा रे! हा एक मोठा हाड आहे. वाघाच्या घशात तो अडकला नाही हे बरे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, पण हातोडा का? तिसऱ्या यूजरने लिहिले, “वाघ झोपला असेल तर ठीक आहे.” चौथ्या यूजरने लिहिले की, “मला पशुवैद्य बनून खूप आनंद होत आहे, पण मी हे सर्व करू शकत नाही. ”