Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहीण भाऊ लपंडाव खेळताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक अनोखी युक्ती वापरुन भाऊ बहिणीला शोधतो.

बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा असतो. ते एकमेकांबरोबर खूप भांडतात पण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. असाच एका बहीण भावाचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तु्म्हालाही तुमचे बालपण आठवू शकते.

हेही वाचा : आजी नातवाचं प्रेम! नातवाला पोळी कशी लाटायची शिकवतेय आजी,व्हिडीओ पाहून आठवेल तुमचे बालपण

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बहीण भाऊ लपंडाव खेळताना दिसत आहे. भावावर डाव असतो तेव्हा चिमुकली बहिण लपताना दिसते. व्हिडीओत पुढे दिसते की भाऊ बहिणीला शोधताना दिसतो पण जेव्हा शोधून सुद्धा बहीण सापडत नाही तेव्हा भाऊ अनोखी युक्ती लढवतो. तो अचानक लोकप्रिय कवितेची पहिली ओळ ‘जॉनी जॉनी’ म्हणतो तेव्हा लपलेली बहीण अचानक ‘येस पापा’ म्हणते आणि त्याला बहिण कुठे लपलेली आहे, हे समजते. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही हसू आवरणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

royal_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून लय हसलो” तर एका युजरने लिहिलेय, “बिचारी चिमुकली” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही चिटींग आहे”