scorecardresearch

Premium

आजी नातवाचं प्रेम! नातवाला पोळी कशी लाटायची शिकवतेय आजी,व्हिडीओ पाहून आठवेल तुमचे बालपण

सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला पोळी कशी लाटायची, हे आजीकडून शिकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे बालपण आठवू शकते.

grandmother love
आजी नातवाचं प्रेम! नातवाला पोळी कशी लाटायची शिकवतेय आजी (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला पोळी कशी लाटायची, हे आजीकडून शिकताना दिसत आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे बालपण आठवू शकते.

असं म्हणतात की आजी आणि नातवंडांचे नाते खूप खास असतात. यांच्या नात्यात प्रेम, काळजी आणि जिव्हाळा असतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला आजी नातवाचे प्रेम दिसून येईल. आजी खूप प्रेमाने नातवाला पोळी लाटण्यास मदत करतेय.

friendship will never end an old man keep friendship video viral of farmers home friendship in old age
Video : ही दोस्ती तुटायची नाय! म्हातारपणातही आजोबा जपताहेत मैत्री, शेतकरी राजाच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
Blindfolded man identifies his wife by just touching her hand
याला म्हणतात खरं प्रेम! डोळ्यावर पट्टी बांधलेली असतानाही फक्त हाताला स्पर्श करताच ओळखलं बायकोला, व्हिडीओ होतोय व्हायरल
a young man draws shree ram beautiful drawing from The Swastik video goes viral on social media
जवानाने ‘स्वस्तिक’ पासून काढले सुंदर श्रीरामाचे चित्र, व्हिडीओ होतोय व्हायरल
my bestfriend does not speak with me a girl student cried in front of the class by watching emotional video school friend and childhood days will remember school video viral on social media
“माझी बेस्ट फ्रेंड माझ्याबरोबर बोलत नाही” भर वर्गात शिक्षकांसमोर ढसा ढसा रडली विद्यार्थीनी, व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल

हा व्हायरल व्हिडीओ घरातील आहे. या व्हिडीओमध्ये आजी खाली बसून चपाती लाटताना दिसत आहे. तिच्या शेजारी तिचा गोंडस नातू सुद्धा लहान पोळपाटवर पोळी लाटताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तो आजीला पाहून पोळी लाटण्याचा प्रयत्न करतो पण त्याला जमत नाही तेव्हा आजी त्याला पोळी लाटायला शिकवते. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या आजीची आठवण येऊ शकते. आजी नातवाचे हे सुंदर नाते पाहून तुम्हीही बालपणीच्या आठवणीत रमून जाल.

हेही वाचा : VIDEO : चक्क हेल्मेटमध्ये लपून बसला होता साप, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल, पाहा व्हिडीओ

seyon_vikram या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” प्रत्येकाने बालपणी आजीला मदत केली असेल.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी सुद्धा माझ्या आजीबरोबर असं करायचो” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “याला शिकवता शिकवता आजी स्वत:च विसरणार” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजीचं प्रेम अविस्मरणीय असतं”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Grandmother love a old lady teach to his grandson how to do chapati or roti or poli by watching video you will remember your childhood days video goes viral ndj

First published on: 28-11-2023 at 10:45 IST

संबंधित बातम्या

×