Viral Video : सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकांचे व्हिडीओ चर्चेत येत असतात. कधी मनसोक्त डान्स करताना तर कधी गाणी म्हणताना, कधी उखाणे घेताना तर कधी खोडकरपणा करतानाचे व्हिडीओ आपण दररोज पाहत असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या व्हिडीओमध्ये एक चिमुकली गाडीवर खोडकरपणा करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली बाइकवर बसलेली आहे.या बाइकवर बसलेल्यांपैकी एक जण बाइक चालवत आहे तर चिमुकलीचे कदाचित आजोबा असावे ते मागे बसले आहे आणि आजोबांच्या मागे चिमुकली बसली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजोबा बाईक चालवत असणाऱ्या व्यक्तीबरोबर बोलत आहे आणि मागे चिमुकली डान्स करताना दिसत आहे.तिच्या डान्स स्टेप्स पाहून ती भरतनाट्यम करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ बाइकमागे असलेल्या कारमधील लोकांनी कैद केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
हेही वाचा : १ ते १० आकडे हातावर काढा आणि साकारा सुंदर मेहंदी डिझाइन, VIDEO एकदा पाहाच
its_me_srinu_1706 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर काही यूजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे.
एका युजरने लिहिलेय, “तिला प्रॅक्टिस करायला पुरेसा वेळ मिळत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “डान्सविषयी तिचे प्रेम पाहा” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाट्य मयुरी” काही युजर्सनी बाइकवर असा डान्स करण्याचा प्रयत्न करु नये, अशा सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहे.