सोशल मीडियावर लहान चिमुकल्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली आत्याबरोबर जोरदार भांडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
सोशल मीडियावर लहान मुलांचे खेळण्याचे, डान्स करण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात पण भांडतानाचा असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली तिच्या आत्यारबरोबर भांडताना दिसत आहे. भांडण इतकं जोरदार असते की ती आत्याला घरातून निघून जाण्यास सांगते. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आत्या चिमुकलीची मजा घेताना दिसत आहे. आत्या चिमुकलीला म्हणते, “हे माझं घर आहे. या घरातून निघ” त्यावर ती चिमुकली सुद्धा उलट बोलत आत्याला म्हणते, “हे माझं घर आहे.. तु निघ” त्यानंतर त्या प्रॉपर्टीवरुन भांडताना दिसतात. आत्या म्हणते, “हे माझ्या पप्पांनी बांधलेलं घर आहे” तर चिमुकली म्हणते, “हे माझ्या पप्पांनी बांधलेलं घर आहे” चिमुकलीचे उत्तर ऐकून आत्याला सुद्धा हसू आवरत नाही. हा मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “कधीही फोन करा, फोन लागेल व्यस्त…” उखाण्यातून नवरीने मांडली व्यथा, नवरदेव पाहतच राहिला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nirvi_aj14 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “किती गोड” काही युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहे