Viral Video : सोशल मीडियावर चिमुकल्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली चक्क भाकरी बनवताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती चुलीवर भाकरी बनवत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
भाकरी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचा पदार्थ आहे. खरं तर भाकरी बनविणे खूप कठीण आहे. अनेक जणांना भाकरी बनवता येत नाही पण ही चिमुकली पारंपारिक पद्धतीने भाकरी बनवताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकली चुलीसमोर बसलेली दिसत आहे. एका मोठ्या कोपरमध्ये ती हाताने भाकरी थापत आहे. थापताना ती भाकरी गोल गोल फिरवत सुद्धा आहे.तिच्या समोर असलेल्या चुलीवर गरम तवा दिसत आहे. या गरम तव्यावर ही चिमुकली थापलेली भाकरी टाकताना दिसत आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क होईल. या चिमुकलीच्या भावाने तिचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
prat.hamesh3881 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझी छोटी बहीण कशी भाकरी करतेय, बघा. या जेवण करायला.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान लवकर शिकलीस भाकरी बनवायचं” तर एका युजरने लिहिलेय, “मस्तच.. कसली भारी भाकरी बनवली” आणखी एका युजरने लिहिलेय, “शेतकऱ्याची वाघीन”