Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली समोसेला इंग्रजीत काय म्हणतात, याविषयी सांगताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

समोसा हा असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना आवडतो. देशातील एक महत्त्वाचा नाश्त्याचा प्रकार म्हणून समोसा लोकप्रिय आहे. सकाळच्या नाश्त्यात किंवा सायंकाळी भूक लागली तेव्हा अनेक जण आवडीने गरमा गरम समोसा खातात.
तुम्हाला समोसा आवडतो का? जर हो तर तुम्हाला माहिती आहे का समोसाला इंग्रजीत काय म्हणतात? अनेक जणांनी याचा विचारही केला नसेल. पण या चिमुकलीने समोसाला इंग्रजीत काय म्हणतात, याविषयी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. चिमुकलीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. समोसा फक्त सांगत नाही तर चक्क बोलून दाखवते.

What Samantha Said?
‘निरागस पतीला का फसवलंस?’, ट्रोलरच्या प्रश्नावर समांथाचं रोखठोक उत्तर, म्हणाली..
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स

हेही वाचा : स्पायडर मॅन जेव्हा गावाकडे येतो… शेतीचे काम करताना दिसला लहानग्याचा सुपरहिरो, पाहा स्पायडर मॅन शेतकऱ्याचा VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली दिसेल. ही चिमुकली व्हिडीओत विचारते की तुम्हाला माहिती आहे का इंग्रजीत समोस्याला काय म्हणतात? या व्हिडीओमध्ये पुढे ती सांगते की समोस्याला इंग्रजीत काय म्हणते. ती व्हिडीओमध्ये बोलून दाखवते. इंग्रजीत समोस्याला स-मो-सा म्हणतात. समोसा म्हणताना नाकावर जोर द्या असं चिमुकली व्हिडीओत सांगते.प्लीज ट्राय करा. चिमुकलीचा हा गोड व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

kashypedia या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्लीज इंग्रजीमध्ये बोला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”किती गोड मुलगी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “तु सुद्धा समोसा सारखी दिसतेय.” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून चेहऱ्यावर हसू आले” हा व्हिडीओ अनेकांना आवडला असून अनेकांनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.