Video : दरवर्षी २६ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिन म्हणून साजरा केला जातो. या श्वान दिनानिमित्त सोशल मीडियावर कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओ मजेशीर असतात; तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका चिमुकल्याचा आणि कुत्र्याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका कुत्र्याला दूध पाजण्यासाठी चिमुकला किती धडपड करीत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला ग्लासमध्ये दूध घेऊन रस्त्यावर येतो. तिथे एक कुत्रा असतो. त्या कुत्र्याने दूध प्यावे म्हणून चिमुकला ग्लासमधील दूध एका मातीच्या भांड्यात टाकतो आणि कुत्र्याला आवाज देतो; पण कुत्र्याचे सुरुवातीला लक्ष नसते तेव्हा चिमुकला त्याच्याजवळ जाऊन त्याला दूध पिण्यास सांगतो.
पुढे व्हिडीओत कुत्रा दुधाच्या भांड्याजवळ येतो आणि दूध पितो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : International Dog Day 2023 : आंतरराष्ट्रीय श्वान दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागचा रंजक इतिहास आणि उद्देश

viaan_rassewatt_ या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी या चिमुकल्याचे कौतुक केले आहेत. काही युजर्सनी त्याला आशीर्वादसुद्धा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिले, “किती चांगले संस्कार आहे. भविष्यात हा चिमुकला चांगला माणूस म्हणून ओळखला जाईल.” तर एका युजरने लिहिले, “अशी चांगली शिकवण लहान मुलांना मिळाली पाहिजे” आणखी एका युजरने लिहिले, “यालाच म्हणतात संस्कार आणि चांगली शिकवण”