Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकला गाणं गाताना दिसत आहे. चिमुकल्याचे गाणं ऐकून तु्म्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला गाणं गाताना दिसत आहे. तो कलयुग चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘जिया धडक धडक’ गाणं गाताना दिसत आहे. त्याचे चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तो खूप मनापासून गाणं गाताना दिसतोय.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्याच्या शेजारी एक तरुण मुलगा बसलेला आहे. तो सुद्धा चिमुकल्याला पाहून हसताना दिसत आहे. व्हिडीओ शुट करणाऱ्यांना सुद्धा चिमुकल्याचे गाणे ऐकून हसू आवरत नाही.
हेही वाचा : VIDEO : शेतकऱ्याची पोर! वडील देताहेत चिमुकलीला शेत नांगरण्याची ट्रेनिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ
zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जिया धडक धडक”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती गोड आहे मुलगा” तर एका युजरने लिहिलेय, “हा चिमुकला मोठा होऊन खूप चांगला गायक होणार” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान” अनेक युजर्सनी चिमुकल्याचे कौतुक केले आहेत.