Viral Video : असं म्हणतात संस्कार हे घरातून शिकवले जातात. घरात मोठ्यांचे अनुकरण करत मुले चांगल्या सवयी आणि गोष्टी अंगीकारतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये एक चिमुकला वडिलांचे अनुकरण करत आजीच्या पाया पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तु्म्हीही थक्क व्हाल.
असं म्हणतात, आपण लहान मुलांसमोर जे करतो, लहान मुले तेच आत्मसात करतात मग त्या चांगल्या सवयी असो की वाईट सवयी. हेच या व्हिडीओतून दाखवले आहे. व्हिडीओत सुरुवातीला तुम्हाला दिसेल की वडील त्याच्या आईला हळूवारपणे गालावर थापड मारण्याची नक्कल करतात ते पाहून चिमुकलाही आजीच्या गालावर थापड मारतो. त्यानंतर वडील आईच्या पाया पडतो तेव्हा ती चिमुकला सुद्धा असतो. वडीलांना आईच्या पाया पडताना पाहून चिमुकला सुद्धा आजीच्या पाया पडतो. या व्हिडीओतून तुम्हाला दिसून येईल की मुलांवर संस्कार घडवण्यात आई वडील आणि कुटूंबाचा किती मोलाचा वाटा असतो.
हेही वाचा : “जबाबदारी वय पाहून येत नाही!” दिव्यांग आजोबांची तीन चाकी सायकल दोरीने ओढत नेतोय ‘हा’ चिमुकला, VIDEO व्हायरल
zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नेहमी मुलांना चांगल्या सवयी शिकवा.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही खूप छान माहिती सांगितली” तर एका युजरने लिहिलेय, “खरंय, मुलं जे बघणार, तेच शिकणार”