scorecardresearch

Premium

भर दिवसा कुत्र्याने त्याच्या मैत्रीणीला नेलं पळवून; मागे मालकीण पुढे कुत्रा, पाहा गमतीशीर VIDEO

या व्हिडीओमध्ये एक कुत्रा भर दिवसा मालकीणीसमोरुन त्याच्या मैत्रीणीला म्हणजेच एका कुत्रीला पळवून नेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

funny video
भर दिवसा कुत्र्याने त्याच्या मैत्रीणीला नेलं पळवून; मागे मालकीण पुढे कुत्रा, पाहा गमतीशीर VIDEO (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर कुत्र्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा भर दिवसा मालकीणीसमोरुन त्याच्या मैत्रीणीला म्हणजेच एका कुत्रीला पळवून नेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

कुत्रा हा माणसाचा अत्यंत जवळचा आणि प्रिय प्राणी आहे. यामुळे अनेक जण आवडीने कुत्रा पाळताना दिसून येतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या पाळीव कुत्रीला दोरीने बांधून रस्त्याने जात असते. व्हिडीओत तु्म्हाला दिसेल की त्यांच्या मागून अचानक एक कुत्रा येतो आणि तिच्या हातची दोरी ओढतो आणि कुत्रीला पळवून घेऊ जातो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हे पाहून चिमुकली कुत्र्यामागे धावताना दिसते. ही अनोखी मैत्री पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Terror of serial rapist in Vasai city
वसई : शहरात पुन्हा एकदा ‘सिरियल रेपिस्टची’ दहशत, मोकाट विकृताचा आणखी एका चिमुकलीवर बलात्कार
Womens Health is there possible to normal delivery after one seizure
स्त्री आरोग्य : एकदा ‘सिझर’ झाल्यावर दुसऱ्यावेळी नॉर्मल प्रसूती होते का?
pune commissioner warned police personnel for taking fine during traffic jam
पुणे: पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा; म्हणाले, ‘चिरीमिरी घ्याल तर…’

हेही वाचा : लहानपण देगा देवा.. मित्रांना बैल बनवून लावली बैलगाडा शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ

mariya____03 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मजेशीरपणे लिहिलेय, “मुलगा सर्वांसमोर मुलीला पळवून घेऊन गेला.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “या प्रेमाला काय नाव देऊ” तर एका युजरने लिहिलेय, “मैत्री असावी तर अशी” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला आले”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A dog carried away his friend or another dog watch funny video goes viral on social media ndj

First published on: 01-12-2023 at 17:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×